बाळूमामाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या 'मनोहर मामा'ला अटक, 'नको ते' केल्याचा आरोप
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ “मनोहर मामा” याला सोलापूर ग्रामीण पोलीस यांनी महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
ADVERTISEMENT

पुणे: स्वतःला बाळूमामाचा अवतार असल्याचा दावा करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ “मनोहर मामा” याला सोलापूर ग्रामीण पोलीस यांनी पुण्यातील मांजरी परिसरातून ताब्यात घेतले आहे. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार तसेच महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमके आरोप काय?
या प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापेमारी करत मनोहर मामाला अटक केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा>> पत्नीचे फिट राहण्यासाठीचे प्रयत्न, पतीला आवडले नाहीत; शटरच्या हँडलला बनवलं शस्त्र, क्रूरपणे हत्या
मनोहर मामा याच्यावर भक्तांकडून पैसे उकळणे, चमत्कारांच्या नावाखाली फसवणूक करणे आणि महिलांचे शोषण केल्याचे आरोप आहेत. “खिशातील नोटांचे अचूक नंबर सांगणारा बाबा” म्हणून त्याची ओळख तयार झाली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक त्याच्या दरबारात जात होते.

धक्कादायक बाब म्हणजे विविध राजकीय पक्षांतील काही नेते, सनदी अधिकारी देखील त्याच्या दरबारात हजेरी लावत असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रकरणांमध्ये मोठ्या पदांसाठी किंवा राजकीय फायद्यासाठी त्याचा सल्ला घेतला जात असल्याचेही सांगितले जात आहे.









