बायकोने नाईटड्रेस परिधान केला, नवऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात, केरोसीन ओतून दिलं पेटवून

मुंबई तक

Crime news : नवऱ्याचा आपल्या बायकोशी कपड्यांवरून वाद झाला, याच वादातून त्याने आपल्या पत्नीला जाळून टाकलं. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नवऱ्याला असं वाटायचं की, पत्नीने नाइट ड्रेस परिधान करावा, पण तिने नकार दिल्याने नवऱ्याने असं कृत्य केलं.  

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोने नाईट ड्रेस परिधान न केल्याने पेट्रोल टाकून पेटवलं

point

नवरा-बायकोच्या नात्याला काळिमा

Crime news : कर्नाटक राज्यातील बेलगावी जिल्ह्यात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नवऱ्याचा आपल्या बायकोशी कपड्यांवरून वाद झाला, याच वादातून त्याने आपल्या पत्नीला जाळून टाकलं. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नवऱ्याला आपल्या पत्नीने नाइट ड्रेस परिधान केल्याचं आवडलं नाही, त्याला राग आनावर न झाल्याने बायकोला पेटवून दिलं. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. 

हे ही वाचा : अंबरनाथ हादरलं, तरुणीवर मनी लॉन्ड्रिंगसाठी दबाव टाकल्याचा आरोप, अखेर पीडितेनं संपवलं जीवन

बायकोने नाईट ड्रेस परिधान केल्याने पेट्रोल टाकून पेटवलं

ही घटना मंगळवारी रात्री खानापूर तालुक्यातील नंदगड गावात घडली होती. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीची ओळख कृष्णा-पाटील (वय 34) समोर आली. तसेच त्याच्या पत्नीचं नाव कृष्णा पाटील (वय 32) असे आहे. या दोघांमध्ये नाईट कपडे परिधान करण्यावरून वाद झाला. आरोपी नवरा कृष्णा पाटीलने पत्नी मंजुळा पाटीवर केरोसीन टाकून पेटवून दिलं. या हल्ल्यात ती 80 टक्के भाजून गेली. 

मंजुळा पाटील यांना बेळगावी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज येथे दाखल करण्यात आले. परिस्थिती पाहून त्यांना गोवा येथील एका रुग्णालयात रेफर करण्यास सांगितलं. नंदगड पोलिसांनी प्रकरण जाणून घेतलं आणि आरोपी नवरा कृष्णा पाटीलला अटक करण्यात आली. 

हे ही वाचा : वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या 'त्या' महिलेबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

दरम्यान, सध्या नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊ लागले आहेत. नवरा आणि बायको आपल्या संसाराचा कसलाही विचार न करता टोकाची भूमिका घेतात. याचमुळे नवरा-बायकोच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.

हे वाचलं का?