घरात आईची हत्या करुन मुंडकं केलं धडावेगळं.. त्याच्यासोबतच मुलीने जंगलात घालवली रात्र!

मुंबई तक

एका मुलीने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. आरोपी मुलीने आईचे मुंडके धडावेगळे केले अन् सबंध रात्र जंगलात घालवली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

घरात आईची हत्या करुन मुंडके धडावेगळे केले

point

नंतर मुंडक्यासोबत जंगलात शातंपणे घालवली रात्र

point

मुलीने रात्रभर काय केलं?

Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीने स्वतःच्या जन्मदात्या आईची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. पूजा मलंग असे या आरोपी मुलीचे नाव असून, तिने बुधवारी (22 एप्रिल) रात्री तिच्या 42 वर्षीय आईचा धारदार चाकूने वार करून गळा चिरला आणि मुंडके धडावेगळे केले. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अनुमाई असं पूजाच्या आईचं नाव असून आसामच्या पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील ही घटना आहे.

आईच्या मुंडक्यासोबत घालवली रात्र

आईवर हल्ला होत असताना तिला वाचवण्यासाठी पूजाचे वडील आणि तिची बहीण धावून गेले. मात्र, क्रूरतेची सीमा ओलांडलेल्या पूजाने त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला, ज्यात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या रक्तरंजित थरारानंतर पूजा आपल्या आईचे कापलेले मुंडके घेऊन जंगलाच्या दिशेने पसार झाली. धक्कादायक बाब म्हणजे, अटकेपूर्वीची संपूर्ण रात्र ती आईच्या मुंडक्यासोबतच वावरत होती, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : अकोला : भोंदूबाबाचा चिमुकल्यांसोबत अघोरी प्रकार, दातांनी पकडून फिरवायचा, खिळ्यांच्या पाटावर...

काळ्या जादूचा संशय

पोलिसांनी गुरुवारी (23 एप्रिल) सकाळी आरोपी पूजा मलंगला अटक केली. ज्या ठिकाणाहून तिला ताब्यात घेण्यात आले, तिथे पोलिसांना विषण्ण करणारे दृश्य पाहायला मिळाले. तिच्याकडे एक विळा, कात्री आणि पूजा-अर्चा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य सापडले. यामध्ये तेल, कुंकू आणि मातीचे भांडे सापडले आहे. या पुराव्यांवरून ही हत्या 'काळ्या जादू'च्या अघोरी प्रथेचा भाग असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. काही गावकऱ्यांच्या मते पूजाने कोणत्यातरी मादक पदार्थाचे सेवन केले असावे.

हे ही वाचा : गिरीश महाजनांना धारेवर धरणाऱ्या ‘त्या’ महिलेच्या अडचणी वाढल्या, वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

हत्येमागे नेमके कारण काय?

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबात यापूर्वी कधीही वादाची तक्रार नव्हती, त्यामुळे या कृत्यामागचे नेमके कारण अजूनही गूढ आहे. पोलिसांनी पूजावर हत्या आणि धोकादायक शस्त्रांनी गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या जखमी वडील आणि बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत की एका 19 वर्षांच्या मुलीला इतके टोकाचे पाऊल उचलण्यास नेमके कशाने प्रवृत्त केले.
 

हे वाचलं का?