संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली याचे तब्बल 15 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून आता त्यांच्या प्रत्येक मिनिटाची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट
संतोष देशमुख यांच्या हत्येचे 15 व्हिडिओ पोलिसांच्या हाती
संतोष देशमुखांना कशा पद्धतीने मारलं याची मिनिट-टू मिनिट माहिती
योगेश काशिद, बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक-एक धक्कादायक गोष्टी या सातत्याने बाहेर येत आहे. आता या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येकाला हादरवून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. संतोष देशमुख यांना कशा पाशवी पद्धतीने ठार मारण्यात आलं त्याचे Video डिटेल्स समोर आले आहेत. मुंबई Tak ला मिळालेली ही एक्स्लुझिव्ह माहिती वाचून आपणही हादरून जाल. एवढ्या भयंकररित्या संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली..
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाइलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते. या सगळ्या गोष्टी पोलिसांनी रिकव्हर केल्या आहेत. याच व्हिडिओचे प्रत्येक मिनिटाचे अपडेट आता समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नराधम आरोपी हे संतोष देशमुखांना तब्बल 2 तासांहून अधिक काळ अत्यंत निर्घृणपणे मारहाण करत होते.
संतोष देशमुखांच्या हत्येचे मिनिट टू मिनिटचे अपडेट
3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणला सुरुवात झाल्याचा पाहिला व्हिडीओ आहे. तर शेवटचा व्हिडिओ हा. 5 वाजून 53 मिनिटांचा आहे. ज्यामध्ये संतोष देशमुख यांचा विव्हळताना एकदम लहान आवाज येत आहे.










