Mira Road Murder : हत्याकांड घडलेला ‘तो’ फ्लॅट आमदार गीता जैन यांच्या पतीचा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mira raod flat where the live in partner murder took place belonged to mla geeta Jain husband bharat jain
mira raod flat where the live in partner murder took place belonged to mla geeta Jain husband bharat jain
social share
google news

मुंबई उपनगरातील मीरा रोडमधील (Mira Road) लिव्ह इन पार्टनर हत्याप्रकरणात आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. या हत्याकांडात आरोपीने 36 वर्षीय लिव्ह इन पार्टनर (live in Partner) सरस्वती वैद्यची क्रुरपणे हत्या करून अत्यंत निर्दयीपणे मृतदेहाची विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला. पण, दुर्गंधीमुळे ही संपूर्ण घटना उघड झाली. या घटनने मुंबईसह संपूर्ण देश हादरला असताना आता नवीन माहिती उजेडात आली आहे. ज्या फ्लॅटमध्ये आरोपीने हे संपूर्ण हत्याकांड घडवलं. तो फ्लॅट आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या पतीचा मालकीचा आहे. (mira raod flat where the live in partner murder took place belonged to mla geeta Jain husband bharat jain)

ADVERTISEMENT

मीरा रोडच्या ज्या फ्लॅटमध्ये लिव्ह इन पार्टनर हत्याकांड घडलं, तो फ्लॅट आमदार गिता जैन यांचे पती भरत जैन यांच्या मालकीचा आहे. या संदर्भात इंडिया टुडेशी बोलताना गीता जैन यांनी माहिती दिली. “मीरा रोडमध्ये ज्या अपार्टमेंटमध्ये लिव्ह इन पार्टनरची हत्या झाली होती, तो फ्लॅट माझे पती भरत जैन यांच्या मालकीचा आहे. तसेच हा फ्लॅट भाड्याने देताना भाडेकरू आणि मालक यांच्यात करार करण्यात आलेला आहे,” अशी माहिती गीता जैन यांनी दिली. तसेच भाडेकरूंनी केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी फ्लॅट मालकांना कसे जबाबदार धरले जाऊ शकते? असे मत गीता जैन यांनी मांडलं. “भाडेकरूच्या वैयक्तिक आयुष्यात आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही,” असेही त्या या प्रकरणावर बोलताना म्हणाल्या.

हे ही वाचा : 28 मुलांवर बलात्कार आणि हत्या, क्रूर सीरियल किलरची थरारक कहाणी

नेमका घटनाक्रम काय?

मीरा रोडच्या गीता आकाश दीप सोसायटीतील सातव्या मजल्यावर रुम क्रमांक 704 मध्ये 56 वर्षीय मनोज साने आणि 36 वर्षीय सरस्वती वैद्य हे दोघे राहत होते. मागील तीन वर्षांपासून ते या फ्लॅटमध्ये राहत होते. पण, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. या वादातून मनोज साने यांनी लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य यांची निर्घृण हत्या केली होती. ही हत्या करून आरोपी थांबला नाही, तर त्याने लाकूड कापायच्या कटरने तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने लिव्ह इन पार्टनरचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि नंतर ते कधी कुत्र्यांना खाऊ घातले, तर कधी मिक्सरमध्ये वाटून नाल्यात फेकले.

हे वाचलं का?

मनोज साने 4 जून रोजी सरस्वती वैद्य यांची हत्या केली होती. दरम्यानच्या दिवसात आरोपीकडून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा संपूर्ण प्रकार सुरु असताना शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी य़ेऊ लागली होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असताना आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आरोपीचे घर उघडताच संपूर्ण घटनेचा उलगडा झाला होता.

हे ही वाचा :तीन बकेट रक्त… प्रेयसीचे तुकडे कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरमध्ये वाटले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT