Mira Road Crime : धक्कादायक! नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली अन्…
पीडीत मुलगी ही मीरा रोड भागात राहायची. ती इयत्ता नववीत शिकत होती. या दरम्यान एका दुकानाच्या माध्यमातून तिची आरोपी रिक्षाचालकाशी ओळख झाली होती.
ADVERTISEMENT
Mira Road Crime News : मुंबई उपनगरातील मीरा रोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका रिक्षा चालकाने (Auto Driver) शाळकरी मुलीशी मैत्री करत तिच्याशी जवळीक साधत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर शाळकरी मुलगी (School Girl) ही तीन महिन्याची गर्भवती राहिली होती. आता आरोपी रिक्षाचालक हा फरार झाला होता. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी 20 वर्षीय रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मीरा रोड (Mira Road) हादरलं आहे. (mira road crime story auto driver rape school girl and three months pregnant crime news mira road mumbai crime)
मिळालेल्या माहितीनूसार, पीडीत मुलगी ही मीरा रोड भागात राहायची. ती इयत्ता नववीत शिकत होती. या दरम्यान एका दुकानाच्या माध्यमातून तिची आरोपी रिक्षाचालकाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर रिक्षाचालकाच्या मनात काही वेगळचं शिजत होते. त्यामुळे आरोपी रिक्षाचालकाने पीडीत शाळकरी मुलीशी ओळख वाढवायला सुरूवात केली होती.
हे ही वाचा : Bacchu Kadu : बच्चू कडू एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना धक्का देणार?
आरोपी रिक्षाचालकाने पीडीत मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी चांगली मैत्री केली होती. या मैत्रीनंतर तिने शाळकरी मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आरोपी रिक्षाचालकाला शाळकरी मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील त्याने तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ऑगस्ट 2023 च्या महिन्यात आरोपी रिक्षाचालकाला मुलीच्या घरी कुणीच नसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपी रिक्षाचालक हा संधी साधून तिच्या घरी गेला. यावेळी तिच्याच घरात जाऊन त्याने तिच्याशी बळजबरीने संबंध ठेवले होते. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्यानंतर आता ही मुलगी तीन महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
हे ही वाचा : अजितदादांचे पदाधिकारी ऐटीत फिरणार, 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ दिल्या गिफ्ट
या प्रकरणी आता पीडीतेच्या कुटुबियांनी 25 डिसेंबरला आरोपी रिक्षाचालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रिक्षाचालक हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक तुकाराम सुकुंड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT