ठाकरेंच्या नेत्यांवर फेसबूक लाईव्ह चालू असतानाच गोळीबार करणारा मॉरिस भाई कोण?
ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करून स्वतः आत्महत्या करणारा मॉरिस भाई नेमका कोण आहे त्याला मॉरिस भाई नावाने का ओळखले जाई त्याची आता चौकशी होऊ लागली. तर त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार का केली असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस भाई कोण
गोळीबार करणारा मॉरिस भाई आहे तरी कोण?
गोळीबार करणाऱ्याला मॉरिसला भाई का म्हटले जाई?
Morris Bhai: कल्याणमधील आमदार गायकवाड गोळीबारची घटना ताजी असतानाच दहिसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळे मुंबईसह महाराष्ट्रही हादरला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि गोळीबार करणारा आरोपी मॉरिस या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
मॉरिसने केली आत्महत्या
दहिसरमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फेसबूक लाईव्ह चालू असतानाच अभिषेक घोसाळकर यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या. मॉरिसच्याच ऑफिसमध्ये अभिषेक घोसाळकरवर गोळीबार केल्यानंतर तिथेच मॉरिसनेही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यामुळे अभिषेक घोसाळकर बरोबरच आता मॉरिस भाई नेमका कोण अशी आता चर्चा होऊ लागली आहे. मॉरिसला कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
स्वयंघोषित समाजसेवक
ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा चिरंजीव व माजी नगरसेवक म्हणू अभिषेक घोसाळकर यांची ओळख होती. मात्र त्यांच्यासोबतच आता मॉरिस भाई हा स्वयंसेवी संस्थाचालक व स्वतःला समाजसेवक अशी त्याची ओळख होती.
हे वाचलं का?
पूर्ववैमनस्यातून वाद
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यामुळे आज जी हत्या करण्यात आली आहे, ती पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.
समाजसेवक नावाने ओळख
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरवर ज्या मॉरिसने गोळीबार केला आहे त्याला मॉरिस भाई या नावाने ओळखला जात होते. तो एक सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगत होता.
ADVERTISEMENT
नेत्यांबरोबर ऊठबस
मॉरिस भाई हा दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधी त्याने अनेक नेत्यांबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमातून हजेरी लावली होती. तो गणपत पाटीलनगरमध्ये काम करत होता. कोरोना काळात मॉरिस भाई यांनी स्थानिकांसाठी काम केलं होतं.
ADVERTISEMENT
बलात्काराचाही गुन्हा
वर्षभरापूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्यांच्याविरुद्ध एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मोरीशवर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मोरीश यांनी सांगितले की, अभिषेक घोसाळकर यांनी आपल्यावर महिलेने गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली होती.
हे ही वाचा >> अभिषेक घोसाळकर नेमके कोण?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT