Murder Case: मायलेकींची गळा चिरून हत्या, सासऱ्याने सांगितली धक्कादायक घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mother and daughter strangled to death in Bihar Buxar
Mother and daughter strangled to death in Bihar Buxar
social share
google news

Murder Case : गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये गुन्हेगारीचे (Bihar Crime) प्रमाण प्रचंड वाढले आहे. बक्सरमध्येही नुकताच एक दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आले आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यात एका महिलेची आणि तिच्या 5 वर्षांच्या मुलीची गळा चिरून हत्या (Mother Daughter Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बक्सरचे पोलीस अधीक्षक मनीष कुमार यांनी शनिवारी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, दोन्हीही मृतदेह बल्लापूर गावात सापडले असून त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याचे दिसून येत असल्याचे दिसत आहे.

ADVERTISEMENT

रक्ताच्या थारोळ्यात आई-मुलगी

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात अनिता देवी ( वय 29) आणि तिची मुलगी सोनी कुमारी अशी मृत झालेल्या मायलेकींची नावं आहेत. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, आई आणि मुलीची हत्या झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्या सर्व वस्तू आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यातही आल्या आहेत. मात्र या हल्ल्याचे आणि हत्येचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. मात्र पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा >> Nalasopara Crime : बापच झाला सैतान! मुलीवर आधी बलात्कार, नंतर केलं असं काही की जीवच गेला

पोलिसांचा तपास सुरु

मायलेकींची हत्या झाल्यानंतर बक्सरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना पोलिसांना समजताच पोलीस अधीक्षकांनी तपास पथकांची निर्मिती करुन वेगवेगळ्या ठिकाणी तपास कार्याला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचेही काम केले जात आहे. मात्र या प्रकरणाती आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?

सासऱ्याला बसला धक्का

अनिता यांची हत्या झाली होती, त्यावेळी त्यांचा पती बबलू यादव हा घरी उपस्थित नव्हते. ते भोजपूर जिल्ह्यातील आरा येथे गेले होते. तर अनिता देवी यांचा सासरा लाला यादव यांनी सांगितले की, त्या दोघींचे मृतदेह आढळून आल्यानंतर त्याची तात्काळ त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे आता लाला यादव यांनी जबाब नोंदवल्याप्रमाणे पोलीस पुढील तपास करत असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

हे ही वाचा >> Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना फासलं काळं, पुण्यात काय घडलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT