अंगावर शहारे आणणारी घटना!, 'महिन्याच्या नवजात बाळाला ओव्हनमध्ये ठेवलं'

मुंबई तक

आपल्या एक महिन्याच्या बाळाला पाळणा समजून ओव्हनमध्ये ठेवल्याने बाळाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना अमेरिकेमध्ये घडली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी मातेला ताब्यात घेऊन बाळाला जळालेल्या अवस्थेतच बाहेर काढण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

newborn baby crime
newborn baby crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'नवजात बाळाला ओव्हनमध्ये ठेवलं'

point

पाळणा समजून बाळाला ओव्हनमध्ये ठेवलं

point

ओव्हनमध्ये बाळ जळून खाक

Crime news: अमेरिकेमध्ये (America) एका धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेमध्ये मातेने आपल्या एक महिन्याच्या नवजात बाळाला तिने ओव्हनमध्ये ठेवल्याने ते जळून खाक झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, तिने ओव्हनला पाळणा समजून बाळाला त्यामध्ये ठेवले होते. त्यातच बाळाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात  आले आहे. 

बाळ ओव्हनमध्ये टाकलं

बाळाला ओव्हनमध्ये ठेवल्याने त्याचा मृत्यू झाला असून त्यांच्या अंगावर भाजल्याच्या खुणा दिसून येत होत्या. ही घटना अमेरिकेतील मिसूरीत घडल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणी मारिया थॉमस या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

हे ही वाचा >> 'मी पण पक्षाला बरंच काही', असं का म्हणाले अशोक चव्हाण?

अमेरिकेतील धक्कादायक घटना

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, ही घटना 9 फेब्रुवारी रोजी मिसुरीमध्ये घडली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा ओव्हनमध्ये ठेवलेले नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. 

ओव्हनमध्ये नवजात खाक

 या घटनेची माहिती देताना सांगितले की, 1 महिन्याच्या चिमुरडीला झोपण्यासाठी तिच्या आईने तिला पाळण्यामध्ये झोपवत होती. मात्र तिने चुकून पाळण्याऐवजी तिने ओव्हनमध्ये बाळाला ठेवले. ओव्हनमध्ये ठेवल्याने ती भाजल्याचे लक्षात येताच त्या मातेनेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

वेदनादायक चित्र

नवजात बाळाला ओव्हनमध्ये ठेवल्याने ती गंभीरित्या भाजून तिला घातलेला डायपरही त्या उष्णतेमुळे वितळला होता. तर बाळाच्या शरीराचे काही भागही प्रचंड जळाला होता. पोलिसांनी सांगितले की, ज्या प्रमाणे बाळाला जखमा झाल्या होत्या ते चित्र खूपच वेदनादायक होतं  असंही यावेळी सांगण्यात आले.

हे ही वाचा >> 'काँग्रेस ही अजरामर म्हातारी ती कधीच मरणार नाही'

हे वाचलं का?

    follow whatsapp