Mukesh Ambani : ‘कितीही सुरक्षा असली तरी, एक शुटर…’, मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी
धमकीच्या मेलमध्ये लिहलंय की, आता रक्कम 400 कोटी रुपये झाल्याचे या मेलमध्ये म्हटलंय. यासोबतच ‘तुमची सुरक्षा कितीही कडक असली तरी आमचा एक शुटर तुम्हाला पुरेसा’ असल्याचे अज्ञात आरोपीने म्हटले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक धमकीनंतर आरोपी पैशाटची रक्कम वाढवत आहे..
ADVERTISEMENT
-दीपेश त्रिपाठी, मुंबई
Death Threat to Mukesh Ambani :प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांना ई मेल पाठवून ही धमकी दिली आहे. या मेलमध्ये ‘तुमची सुरक्षा कितीही कडक असली तरी, आमचा एक शुटर पुरेसा आहे’, अशी धमकी देण्यात आली आहे. यासह अज्ञाताने मुकेश अंबानी यांच्याकडे 400 करोड रूपयांची मागणी केली आहे. या धमकीने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसां नी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. (mukesh ambani third time death threat mail demand of 400 crores famous businessman)
ADVERTISEMENT
धमकीच्या ई-मेलमध्ये काय?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा धमकीचा (Death Threat) ई-मेल आला आहे. सोमवारी 30 ऑक्टोबरला अंबानी यांना हा धमकीचा मेल आला होता. या धमकीच्या मेलमध्ये लिहलंय की, आता रक्कम 400 कोटी रुपये झाल्याचे या मेलमध्ये म्हटलंय. यासोबतच ‘तुमची सुरक्षा कितीही कडक असली तरी आमचा एक शुटर तुम्हाला पुरेसा’ असल्याचे अज्ञात आरोपीने म्हटले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक धमकीनंतर आरोपी पैशाटची रक्कम वाढवत आहे..
हे ही वाचा : नववधू हादरली… Honeymoon च्या रात्री व्हायग्रा घेऊन पतीकडून अनैसर्गिक संबंध
धमकीचा दुसरा मेल
याआधी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना 29 ऑक्टोबरला दुसरा धमकीचा ई-मेल आला होता. ईमेल करणार्याने म्हटले आहे की, अद्याप आमच्या ईमेलला कोणतंही उत्तर दिलं गेलं नाहीये. त्यामुळे आता 200 कोटी रुपये द्यावे लागतील. जर असे केले नाही तर लक्षात ठेवा की डेथ वॉरंटवर आधीच स्वाक्षरी झाली आहे. ज्या ईमेलमधून धमकी देण्यात आली आहे, त्यात म्हटलं आहे की, “U have not responded to our email. Now the amount is 200 crore, otherwise the death warrant is signed.(तुम्ही आमच्या ईमेलला उत्तर दिलं नाहीये. आता 200 कोटी रुपये द्या, अन्यथा डेथ वॉरंटवर स्वाक्षरी झालीच आहे”.
हे वाचलं का?
धमकीचा पहिला मेल
यापूर्वी धमकी देणाऱ्या व्यक्तीने 27 ऑक्टोबर रोजी पहिला मेल पाठवला होता. मुकेश अंबानींच्या कंपनीच्या ईमेल आयडीवर पाठवलेल्या ईमेलमध्ये ‘तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहे’, असे लिहिले होते.
आरोपीची ओळख पटली ?
दरम्यान या प्रकरणी मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, ज्या ई-मेलवरून अंबानींना धमकी देण्यात येत आहे, तो ई-मेल शादाब खान नावाच्या व्यक्तीचा आहे. तसेच हे बेल्जियमवरून पाठवले जात आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maratha Reservation : आरक्षणासाठी कराव्या लागतील ‘या’ गोष्टी, भोसले समिती अहवालात काय?
आता पोलीस ज्या ई-मेलवरून धमकी देण्यात येत आहे, तो आयडी योग्य आहे, किंवा फेक आयडीवरून पाठवला गेला आहे,
याचा शोध घेत आहे. यासोबतचं बेल्जियमच्या मेल प्रोव्हायडर कंपनीशीही संपर्क साधून त्यांच्याकडून या मेल आयडीची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील अज्ञात आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT