Mumbai Crime: 'धक्का मारला, छातीवर बसला अन् अंगठाच चाऊन फाडला'; सोसायटी मीटिंगमध्ये भयानक थरार!
Crime News : दहिसर पश्चिम येथील एका सोसायटीत एक भयानक घटना घडली आहे. येथील सोसायटीच्या मीटिंगमध्ये चेअरमनचा एका सभासदासोबत जोरदार वाद झाला. काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पीडित सभासदाचा अंगठा चेअरमनने चाऊन फाडला
सोसायटी चेअरमनविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : Mumbai Crime News : दहिसर पश्चिम येथील एका सोसायटीत एक भयानक घटना घडली आहे. येथील सोसायटीच्या मीटिंगमध्ये चेअरमनचा एका सभासदासोबत जोरदार वाद झाला. काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर, सोसायटीच्या चेअरमनने सभासदाला जमिनीवर ढकलले आणि नंतर छातीवर बसवून मारहाण करत त्याच्या डाव्या हाताचा अंगठा चावून फाडला. याप्रकरणी पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (mumbai crime dahisar west news voilence in amarnath society chairman chewed thumb of member in meeting case filed by police)
ADVERTISEMENT
आता तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्रकरण म्हात्रे वाडी येथील अमरनाथ अपार्टमेंट सोसायटीतील आहे. रविवारी (4 जुलै) दुपारी सोसायटीचे चेअरमन नित्यानंद परिहार यांनी सभासदांची बैठक बोलावली होती. या सभेत सर्व सदस्य आपली मते मांडत होते. दरम्यान, सदस्य आदित्य देसाई यांनी आपली अडचण मांडत अध्यक्षांना यासाठी जबाबदार धरले. या प्रकरणावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.
हेही वाचा : Bangladesh Violence: आरक्षणाच्या वादामुळे पंतप्रधानपद गेलं, बांग्लादेशात तुफान हिंसाचार.. शेख हसीना भारतात!
पीडित सभासदाचा अंगठा चेअरमनने चाऊन फाडला
काही वेळातच वाद इतका शिगेला पोहोचला की, सोसायटीचे चेअरमन जागेवरून उठला आणि त्याने आदित्य देसाई यांना धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले. यानंतरही चेअरमन नित्यानंद परिहार काही गप्प बसला नाही. त्याने आदित्य देसाई यांच्या छातीवर बसून मारहाण केली. आदित्य देसाई यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता चेअरमनने त्यांचा अंगठा दाताने चावून फाडला. या घटनेत आदित्य देसाईंच्या अंगठ्याचे दोन तुकडे झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने आदित्य देसाई यांना रुग्णालयात नेले.
हे वाचलं का?
हेही वाचा : MNS : विधानसभेसाठी राज ठाकरेंचे तीन शिलेदार ठरले...
सोसायटी चेअरमनविरुद्ध गुन्हा दाखल
आदित्य देसाई यांची प्रकृती पाहून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तातडीने दाखल केले. मात्र, नंतर मलम आणि प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे सोसायटी चेअरमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या तपासात आरोप सिद्ध झाल्यास सोसायटीच्या चेअरमनला अटक केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT