MNS : विधानसभेसाठी राज ठाकरेंचे तीन शिलेदार ठरले...

मुंबई तक

ADVERTISEMENT

raj thackeray mns vidhan sabha election three candidate declare bala nandgaonkar dilip dhotre sandip deshpande solapur tour maharashtra politics
मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार ठरले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार ठरले

point

मनसे लवकरच यादी जाहीर करणार

point

आदित्य ठाकरेंविरोधात हा उमेदवार उतरवणार

Raj Thackeray, Vidhan Sabha Election : विजयकुमार बाबर, सोलापूर :  आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षानी तयारी सुरु केली आहे. त्यानुसार मतदार संघाची चाचपणी आणि बैठकांचा धडाका सुरु आहेत. अशात लोकसभेला भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. हे तीन उमेदवार कोण आहेत? हे जाणून घेऊयात. ( raj thackeray mns vidhan sabha election three candidate declare bala nandgaonkar dilip dhotre sandip deshpande maharashtra politics) 

राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तीन उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरेंचे विश्वासू बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवडी विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरणार आहेत. तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. 

हे ही वाचा : Bangladesh Violence: आरक्षणाच्या वादामुळे पंतप्रधानपद गेलं, बांग्लादेशात तुफान हिंसाचार.. शेख हसीना भारतात!

दरम्यान राज ठाकरे यांना पुतण्याबद्दल विचारले असता, वरळीमधून कोण उभं राहतय हे आम्हाला काही देणेघेणे नाही,आमचं उमेदवार निश्चित आहे,लवकरच यादी समोर येईल अशी माहिती राज ठाकरेंनी पत्रकार परिषदमध्ये बोलताना दिली. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातुन आदित्य ठाकरे विरोधात मनसेचा उमेदवार शड्डू ठोकणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2009 मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवली होती, त्यावेळी मनसेला वरळी मतदारसंघातून 36 ते 38 हजार मतं मिळाली होती.
या वेळी मनसे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले जाण्याची चर्चा आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी होकारार्थी उत्तर देत विधानसभा निवडणुकीसाठी वरळीचा उमेदवारही निश्चित झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वरळीत आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे टक्कर देणार हे निश्चित मानले जात आहे.

हे ही वाचा : Mukhyamantri Annapurna Yojana : महिलांनो...तरच वर्षाला तीन सिलिंडर मिळणार मोफत, कारण...

उद्धव ठाकरे, भाजपला आव्हान

शिवडीमध्ये ठाकरेंचे विश्वासू अजय चौधरी हे सध्या विद्यमान आमदार आहेत. तर वरळीतही ठाकरेंचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे विद्ममान आमदार आहेत. त्यामुळे मनसेच्या दोन उमेदवारांची लढत थेट उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराशी होणार आहे. तसेच पंढरपूरमधून भाजपचे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या या उमेदवाराविरोधात मनसेने उमेदवार मैदानात उतरवला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT