Mumbai Crime : ‘हॉट दिसतेस, किस घ्यावा वाटतोय’, कोर्टाने थेट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbai crime man gets three year jail for calling minor girl hot and touch hee shocking crime story
mumbai crime man gets three year jail for calling minor girl hot and touch hee shocking crime story
social share
google news

Mumbai Crime News : कॉलेज जवळील टपरी असो किंवा एखाद्या नाक्यावर उभे राहून, अनेक तरूण येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर शेरेबाजी करतात. या शेरेबाजीत हे तरूण मुलींवर अश्लील शब्दाचा वापर करत असतात. अशाच प्रकारची शेरेबाजी करणे आणि मुलीला चुकीचा स्पर्श करणे एका वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. कारण मुंबईतील एका विशेष न्यायालयाने 50 वर्षीय आरोपी वृद्धाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (mumbai crime man gets three year jail for calling minor girl hot and touch hee shocking crime story)

ADVERTISEMENT

मुंबईत 24 मे 2016 रोजी घडलेली ही घटना आहे. म्हणजेच साधारण 7 वर्षापूर्वीची ही घटना आहे. या घटनेदरम्यान पीडीत तरूणीचे वय हे फक्त 13 वर्ष होते. घटनेच्या दिवशी पीडीत तरूणी तिच्या मैत्रिणीसोबत मशिदीसमोर उभी होती. यावेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि त्याने तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. त्यानंतर त्याने ‘तु खूप हॉट दिसतेय, तुझे चुंबन (किस्स) घ्यायचे आहे’ आणि ‘तुला माझ्यासोबत घेऊन जाईन’ असे तिला उद्देशून म्हटले होते.

हे ही वाचा : Manoj Jarange : शिंदे सरकारला जरांगेंचा स्पष्ट ‘मेसेज’; म्हणाले “देव सुद्धा मराठ्यांना…”

या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी या प्रकरणी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने पीडीत तरूणी आणि आरोपी वृद्धाची साक्ष नोंदवून घेतली होती. यावेळी पीडीत मुलीने कोर्टाला आरोपीने चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याची तसेच हॉट म्हणत किस घेण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपीने देखील आपली बाजू कोर्टात मांडली होती.

हे वाचलं का?

या प्रकरणाता निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि हॉट सारख्या शब्दांचा प्रयोग करणे हेच दर्शवते की आरोपीने हे कृत्य अन्य कोणत्याही कारणासाठी केले नसून केवळ तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने केले आहे. त्यामुळे हे देखील सिद्ध झाले आहे की आरोपी मुलीचा पाठलाग करायचा आणि तिचा लैंगिक छळ करायचा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहेत.

हे ही वाचा : JSW : “ऑफिसला बोलावलं अन् बलात्कार केला”, उद्योगपती सज्जन जिंदालांवर गुन्हा दाखल

त्यामुळे विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एस.सी. जाधव यांनी 14 डिसेंबर रोजी आरोपींना आयपीसी कलमांतर्गत पाठलाग आणि विनयभंग तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या तरतुदींखाली दोषी ठरवले आहे. तसेच 50 वर्षीय आरोपीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT