Mumbai Crime : संतापजनक! मावस भावांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
या प्रकरणात पीडीत मुलीला अचानक पोटदुखी झाली होती. ही साधेसुधी पोटदुखी असावी असा कुटुंबियांना अंदाज असल्याने त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले असता त्यांना हादराच बसला.
ADVERTISEMENT
Mumbai Crime News : विक्रोळीतून (Vikhroli) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन मावस भावांनी मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिस्किटांचे आमिष दाखवून या दोन मावस भावांनी लैंगिक अत्याचार (Minor rape) केले होते. या प्रकरणात आता अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता पार्क साईट पोलिसांनी (parksite police) आरोपींवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात दोन आरोपींना देखील अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.(mumbai crime news two step brothers rape minor girl parksite police case file shocking crime story from vikroli)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी परिसरात पीडीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. या पीडितेच्या घरात तिचे दोन्ही 18 आणि 22 वर्षीय मावस भाऊ देखील राहतात. या दरम्यान घरातील मोठी मंडळी बाहेर गेल्यानंतर दोन्ही मावस अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करायचे. अल्पवयीन मुलीला घरात एकटीला पाहून आरोपी भाऊ तिला बिस्किटाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करायचे. तसेच तिचा लैंगिक शोषण करायचे. या घटनेत आरोपी भावांमधील एकाने तर तिचा दोन वेळा बलात्कार केला होता. दरम्यान पीडीत मुलगी मावस भावांचा छळ निमूटपणे सहन करायची. तिने या घटनेची कुठेही वाच्यता केली नव्हती. त्यामुळे ही घटना उघडकीस आली नव्हती.
हे ही वाचा : Shivsena : ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयावर बुलडोझर, सांगलीत दोन गटात जबरदस्त राडा
दरम्यान या प्रकरणात पीडीत मुलीला अचानक पोटदुखी झाली होती. ही साधेसुधी पोटदुखी असावी असा कुटुंबियांना अंदाज असल्याने त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले असता त्यांना हादराच बसला. कारण त्यांची 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही गरोदर झाली होती. तिच्या पोटात एक भ्रूण वाढत होतं. या संपूर्ण घटनेने पीडीत मुलींच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
हे वाचलं का?
या घटनेनंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन या संपूर्ण घटनेची विचारणा केली असता, तिने अनेक धक्कादायक खुलासे केले.आरोपी मावस भावांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने आईला सांगितेल. त्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी आता पार्क साईट पोलिसांनी आरोपींवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात दोन आरोपींना देखील अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत..
हे ही वाचा : Jitendra Awhad : “शरद पवार हे पाण्यात रडणारा मासा, भुजबळ सुपारी घेतलेला पोपट”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT