घड्याळ दुरुस्ती करणाऱ्याकडे सापडला 1.3 कोटींचा ‘माल’, नेमकं होतं तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai drugs crime branch 1.3 crore worth of drugs found with watch repairer
mumbai drugs crime branch 1.3 crore worth of drugs found with watch repairer
social share
google news

Mumbai Crime : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात अंमल पदार्थ (Drugs) बाळगल्याप्रकरणी अनेकजणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) 1 किलो एमडी (Mephedrone) ड्रग्ज सापडल्या प्रकरणी एकाला अटक केल आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 1.3 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखी कोणी आहे त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

ADVERTISEMENT

ड्रग्ज प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट तीनने कासिम मोहम्मद शिवानी (42) नावाच्या व्यक्तीला अमली पदार्थांसह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपीवर याआधीही त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘मी कुणाचीच…’, अजितदादांनी सोडलं मौन, मीरा बोरवणकरांना प्रत्त्युतर

पोलिसांचा संशय खरा ठरला

या आधी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ बाळगल्याप्रकरणी कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड येथे राहणारा कासिम हा घड्याळ दुरुस्तीचे काम करतो. त्याच्या आड राहूनच तो हे अंमली पदार्थ विकत असल्याचा संशय पोलिसांना आला होता.

हे वाचलं का?

झडती घेताच गुन्हेगार सापडला

कासिम शिवानीच्या शोधासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र त्याआधी पोलिसांचे एक पथक त्याच्या गस्तीवरच होते. ज्यावेळी युनिट तीनचे अधिकारी लोअर परळ (पूर्व) भागात पोहचले होते. तेव्हा त्या ठिकाणी तेथे एक संशयित व्यक्ती कोणाची तरी वाट बघत असल्याचे पोलिसांना संशय आला. ज्यावेळी त्याच्याकडे पोलिसांनी जात त्याची चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना तो योग्य पद्धतीने उत्तरं देऊ शकला नाही. ज्यावेळी पोलिसांना त्याचा संशय आला त्यावेळी मात्र त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याचे आढळून आले, व त्याला अटक करण्यात आली.

हे ही वाचा >>Crime: मुलींनी सिगारेट ओढणं आवडलं नाही, वृद्धाने एका मिनिटात…

अंमली पदार्थांच्या गुन्ह्याची साखळी

या प्रकरणी त्याला 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, कासिमवर यापूर्वीही अंमली पदार्थ विरोधी कक्ष आणि डोंगरी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT