Mumbai Crime: संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् बायकोच्या मानलेल्या भावाचे केले पाच तुकडे
एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येने सध्या नवी मुंबई हादरली आहे. ईश्वर भगवान गायकवाड असे या मृत मुलाचे नाव आहे. संशयातून ईश्वरची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
ADVERTISEMENT

एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येने सध्या मुंबई (Mumbai) हादरली आहे. ईश्वर भगवान गायकवाड असे या मृत मुलाचे नाव आहे. संशयातून ईश्वरची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपीने त्याचे तुकडे तुकडे करून मृतदेह घरातच लपून ठेवला होता. ज्यावेळेस कुटुंबियांनी ईश्वरची चौकशी केली त्यावेळेस आरोपीने या भयानक घटनेची कबूली दिली. (mumbai 17 year old boy brutally murdered suspected of having affaire with wife crime story)
मुंबईच्या चेंबूर (Chembur) परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत मृत ईश्वर गायकवाडचे पालनपोषण आरोपीची बायको आणि तिचे वडील करायचे. मृत ईश्वर हा त्यांचा मुलगा नव्हता ते फक्त त्याची देखभाल करायचे. यामुळेच आरोपीची बायको ईश्वरला मानलेला भाऊ मानायची. या नात्याने ईश्वरचे आरोपीच्या घरी येणे जाणे असायचे.
हे ही वाचा : Crime: ‘मुलगा अशुभ होता, म्हणून…’, एका वर्षाच्या चिमुकल्याचा गळा घोटला
या दरम्यान आरोपीने ईश्वरची निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने ईश्वरचे तुकडे तुकडे करून मृतदेह घरातच लपवून ठेवला होता. तब्बल दोन दिवस आरोपीने ही घटना लपवून ठेवली होती. या दरम्यान ईश्वरचा काहिच ठावठिकाणा लागत नसल्याने आरोपीच्या बायकोच्या वडीलांनी मुलीकडे येऊन विचारपूस केली होती.
वडिलांनी जावयाला विचारले, ईश्वर कुठे आहे? तो तुझ्यासोबत गेलेला? आरोपीने यावर मला नाही माहिती कुठे आहे, असे उत्तर दिले होते. तुला माहित नाही, मग कुणाला माहिती आहे? असा पुन्हा विचारले. या सर्व प्रकारानंतर आरोपीने सासऱ्यांना ईश्वरची हत्या केल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यासोबत मृतदेह घरातच लपवून ठेवल्याचेही सांगितले.