Navi Mumbai : ‘पिल्लू फक्त दोन मिनिटे त्रास होईल…’, गळा घोटला मग प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

navi mumbai crime news boyfrind murder her girlfriend and commit suicide shocking love story end crime news
navi mumbai crime news boyfrind murder her girlfriend and commit suicide shocking love story end crime news
social share
google news

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता झालेल्या एका तरूणीच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. वैष्णवी बाबर असे या (19) वर्षीय मृत तरूणीचे नाव होते. वैष्णवीची हत्या ही तिच्याच प्रियकराने केल्याचा आता उलगडा झाला आहे. इतकचं नाही तर या हत्येनंतर प्रियकराने स्वत:च आयुष्य देखील संपवलं होतं. त्यामुळे आता प्रियकराने (Boyfriend) वैष्णवीची हत्या का केली? तसेच या प्रेम कहाणीचा (Love Story) असा अंत का झाला, हे जाणून घेऊयात. (navi mumbai crime news boyfrind murder her girlfriend and commit suicide shocking love story end crime news)

कळंबोली (Kalamboli) परिसरात वैष्णवी बाबर (19) आणि वैभव बुरंगले (24) हे त्यांच्या त्यांच्या कुटुंबियासोबत शेजारी-शेजारी राहत होते.या दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते आणि त्यांना लग्न देखील करायचे होते. मात्र कुटुंबियांचा त्याच्या लग्नाचा विरोध होता. कुटुंबियांच्या या विरोधानंतर अचानक एके दिवशी वैष्णवी बाबर बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र या तक्रारीला महिना उलटून देखील पोलिसांना तिचा काहीच सुगावा लागत नव्हता.

हे ही वाचा : बाबासाहेबांचा ‘तो’ इशारा! …म्हणून आंबेडकरांनी नाकारलं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण

अखेर या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपविण्यात आला होता. आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. या पथकाने वैष्णवीच्या कॉलेजपासून तपासाला सुरुवात केली होती. ती एका तरूणासोबत रेल्वेने प्रवास करताना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर खारघर स्थानकात उतरून ती टेकडीच्या दिशेने गेली. त्यानंतर टेकडीवरून परतताना तरूण एकटाच खाली आला पण वैष्णवी काही आली नाही. त्यामुळे टेकडीवर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे पोलिसांनी हत्येपुर्वी वैष्णवीसोबत सीसीटीव्हीत दिसलेल्या तरूणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. या दरम्यान 12 डिसेंबरला एका तरूणाने जुईनगर स्थानकात आत्महत्या केल्याचे समोर आले होते. हा तरूण वैष्णवीचा प्रियकर वैभव बुरूंगलेच होता. वैष्णवीच्या हत्येपूर्वी तिच्यासोबत असलेल्या एकमेव साक्षीदाराने आत्महत्या केल्याने पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते.

दरम्यान या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी वैभव बुरुगळेचा मोबाईत ताब्यात घेतला.या मोबाईलमधून पोलिसांच्या होती मोठे पुरावे लागले होते. पोलिसांना मोबाईलमध्ये एक व्हॉईस नोटही सापडली होती. ज्यामध्ये ‘पिल्लू फक्त दोन मिनिट त्रास होईल, त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू’, अशी तिची समजूत काढताना दिसला आहे. दोघांचे लग्न होणार नसल्याने ती माझी नाही झाली तर कोणाचीही होणार नाही. या भावनेतून त्याने हत्येचा कट रचल्याचे समोर आले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation: जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावून सांगितलं ‘मुंबईत गोळ्या झेलण्यास…’

व्हॉईस नोटनंतर पोलिसांना वैभवनेच वैष्णवीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तिचा मृतदेह शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यात वैभवच्या मोबाईल नोटमधून पोलिसांना एल.ओ.1-501 एक कोड नंबर आढळला होता. मात्र हा कोड कुठला आहे याचा सुगावा लागत नव्हता. तसेच पोलिसांनी घटनास्थळी म्हणजेच टेकडीवर जाऊन तब्बल 4 दिवस शोध मोहिम राबवली, मात्र तरी पोलिसांच्या हाती काही लागले नाही.

ADVERTISEMENT

तपासा दरम्यान टेकडीवर लावण्यात आलेल्या झाडावरील वृक्ष जनगणेवर पोलिसांची नजर पडली आणि त्यांनी वन विभागाच्या मदतीने एल.ओ.1-501 नंबर असलेला झाड शोधून काढले असता या हत्येचा उलगडा झाला. घटनास्थळी पोलिसांना वैष्णवीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे अखेर पोलिसांना या हत्येचा घटनेचा उलगडा करण्यात यश आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT