Navi Mumbai: आई टोमणे मारायची म्हणून.. मध्यरात्री मुलाचं भयंकर कृत्य
नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. बेरोजगार मुलाला त्याची आई नोकरीवरून त्याला जाब विचारत होती. त्या रागाच्या भरात मुलाने मध्यरात्री आईचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
Navi Mumbai Crime: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे (Crime Rate) प्रमाण वाढले आहे. तर नवी मुंबईमध्ये एका साध्यासुध्या कारणासाठी आपल्या 46 वर्षाच्या आईची हत्या (Mother Murder) करण्यात आली आहे. ही हत्या झाल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, बेरोजगार (Jobless) असलेल्या मुलाला त्याच्या कामावरुन त्याला टोमणे मारत होती. त्या रागातून मुलाने आईची गळा दाबून हत्या केली. ही घटना 20 ऑक्टोबर रोजी झाली असून तुर्भे पोलीस (Turbe Police) पुढील तपास करत आहेत. (navi mumbai mother taunt her son he did not have job son killed him strangulation)
ADVERTISEMENT
तुर्भे पोलिसांनी सांगितले की, ही घटना कोपरी गावातील एका अपार्टमेंटमध्ये घडली असून आईची हत्या केल्या प्रकरणी रूपचंद रहमान शेख (वय 21) या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation : बीडमध्ये अजित पवार गटाच्या आमदाराचा बंगला आंदोलकांनी पेटवला
नोकरी नसल्यामुळे घरात वाद
ही हत्या झाल्याची घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हत्येचा तपास करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची माहिती सांगताना म्हणाले की, सलमा उर्फ जहांआरा खातून या एका अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलासोबत राहत होत्या. मुलगा बेरोजगार असल्यामुळे आई आणि मुलाचे सातत्याने वाद होत होते. कालही त्यांचा मुलगा आणि त्याला काम नसण्याच्या कारणावरुन त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. त्या दोघांचा वाद इतका टोकाला गेला की, रात्री दीड वाजता त्या रागाच्या भरातच त्याने आपल्या आईची गळा दाबून हत्या केली.
हे वाचलं का?
महिलेच्या मुलीने केला गुन्हा दाखल
ही घटना घडल्यानंतर हत्या झालेल्या महिलेच्या मुलीला ही घटना सांगण्यात आली. त्यानंतर महिलेच्या मुलीनेच आपल्या आईची हत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. स्वतःच्या मुलाने आईची हत्या केल्याने अनेक जणांना धक्का बसला आहे. मात्र मुलाच्या कामावरून त्याला टोमणे मारणे हा प्रकार केला जात असल्यामुळेच त्या रागातून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
हे ही वाचा >> MLA Disqualification case : ’31 डिसेंबरच्या आत निर्णय घ्या’, सुप्रीम कोर्टात नार्वेकरांना झटका
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT