Beed News : अजित पवार गटाच्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या, कारण समोर
Bapu Andhale Beed news : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून बीड जिल्ह्यात हिंसक घटना घडत असून, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
परळी शहरात गोळीबाराची घटना
अजित पवार गटातील सरपंच बापू आंधळे यांची हत्या
पाच गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती
Beed News : (रोहिदास हातागळे, बीड) लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून धुमसत असलेल्या बीड जिल्ह्यात हिंसक घटनांचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आता चक्क सरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अजित पवारांच्या काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांची शनिवारी रात्री (29 जून) हत्या करण्यात आली. या घटनेत दोघे जखमी झाले आहे. (Ajit Pawar's NCP Sarpanch Bapu Andhale was shot dead in Parli)
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यातील परळी शहरात शनिवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. परळी तालुक्यातील मरळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला.
हेही वाचा >> पोलिसांनी बेड्या ठोकताच शिंदेंची बीड जिल्हाप्रमुखावर मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (29 जून) रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सरपंच बापू आंधळे आणि ग्यानबा गित्ते परळीतील बँक कॉलनी परिसरात उभे होते.
हे वाचलं का?
हेही वाचा >> भाजपचे आष्टीचे माजी आमदार हनीट्रॅपच्या जाळ्यात? 1 कोटीची मागितली खंडणी
त्यावेळी अचानक हल्लेखोर आले आणि त्यांनी बापू आंधळे यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर केले. यात बापू आंधळे यांना गोळ्या लागल्या आणि ते जागेवरच ठार झाले. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एकाचे नाव ग्यानबा गित्ते आहे. दोन्ही जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंधळे यांना पाच गोळ्या लागल्याची माहिती आहे.
शरद पवार गटातील नेत्यावर गुन्हा
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक देवाण घेवाणीवरून ही घटना घडल्याचा उल्लेख एफआरआयमध्ये आहे.
ADVERTISEMENT
ग्रामपंचायत निवडणुकीत काय झाले होते?
मिळालेल्या माहितीनुसार मयत बापू आंधळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसेच बबन गित्ते यांच्या पॅनलमधून ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती आणि सरपंच म्हणून निवडून आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
ADVERTISEMENT
परळीमध्ये खळबळ
बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त पसरताच परळी शहरात खळबळ उडाली. प्रकरणाची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेनंतर परळी शहरातील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT