वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी बारावीतील मुलीने जीव गमावला, चिरला कोयत्याने गळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Palghar mokhada girl was killed slitting her throat one-sided love
Palghar mokhada girl was killed slitting her throat one-sided love
social share
google news

Palghar Crime: आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना बारावीच्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार (Attack) करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील मोखाड्यात (Palghar Mokhada) घडली. मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदार या विद्यार्थिनीच्या हत्येने (Student Murder) खळबळ उडाली असून प्रेम (Love matter) प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

वाटेतच जीवघेणा हल्ला

पालघरमधील आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनीच्या हत्येने मोखाडा हादरले. आश्रम शाळेतून महाविद्यालयात चालत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच मित्राने कोयत्याने वार करून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अर्चना उदार ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करेपर्यंत विद्यार्थिनीचा वाटेतच मृत्यू झाला. विशेष म्हणजे काल अर्चनाचा वाढदिवस होता, तिच्या वाढदिवसानंतर एकाच दिवसाने तिची हत्या झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा >> Solapur: पोलीस अधिकाऱ्याने डोक्यातच गोळी झाडून घेतली, असं काय घडलं?

लग्नाला विरोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थिनी अर्चना उदार आणि आरोपी प्रभाकर वाघेरा यांच्यामध्ये मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते . मात्र या विद्यार्थिनीच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे तिने लग्नाला नकार दिला होता. त्या नकाराचा राग मनात धरुनच आज अर्चना आडरस्त्याने महाविद्यालयात जात असताना आरोपीने अर्चनाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली. मृत विद्यार्थिनी सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड केल्यानंतर आरोपीने जंगलात पळ काढला. विद्यार्थिनीच्या झालेल्या हत्यानंतर मोखाडा पोलीस ठाण्यात 302 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

आश्रम शाळांमध्ये घबराट

पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील व्यवस्थापनाचा उडालेला बोजवारा अनेक वेळा उघडकीस आला आहे . त्यातच आता विद्यार्थिनीच्या झालेल्या हत्येनंतर आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . अर्चनाच्या हत्येनंतर आश्रमामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सध्या भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Asian Games: चीनच्या भूमीत भारताचा इतिहास! सुवर्ण पदकांची केली लयलूट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT