नवी मुंबई: 19 वर्षाच्या तरुणीवर डझनभर वार, मृतदेह पाहून पोलीसही हादरले!

ADVERTISEMENT

Panvel taluk of Navi Mumbai body of 19-year-old girl found stab wounds on the body
Panvel taluk of Navi Mumbai body of 19-year-old girl found stab wounds on the body
social share
google news

Panvel Murder: पनवेल तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे आता पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. पनवेलमधील भिंगरी गावाजवळील सर्व्हिस रोडवर नवी मुंबई पोलिसांना 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह (body of a 19-year-old girl) आढळून आला. तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिच्या शरीरावर चाकूचे अनेक वार केल्याचे आढळून आले आहेत. मात्र तरुणीची हत्या का करण्यात आली आहे त्याचा तपास आता पोलीस करत आहेत. भिंगरी गावाजवळ तरुणीचा मृतदेह रस्त्याकडेला आढळून आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली नंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह विकृत

पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर तिच्या शरीरावर चाकुने अनेक वार करण्यात आले होते. त्यामुळे मृतदेह विकृत झाला होता. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> 1.5 कोटी कमावलेल्या PSI ची लागली वाट, ऑनलाइन गेमिंगमुळेच झाला ‘गेम’

शरीरावर फक्त जखमा

पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर मुलीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा दिसून आल्या होत्या. मृत महिलेचं नाव जयश्री बाब्या पवार असे असून ती पेण येथील जोगेश्वरी कडेसपाडा गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गुन्हेगाराचा शोध सुरुच

पनवेल तालुक्यातील भिंगरी गावाजवळ पळस्पे ते शिवशंभो महामार्गादरम्यानच्या सर्व्हिस रोडवर मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले की, अज्ञात व्यक्तीने महिलेची हत्या ही दोन दिवस आधी केली असावी अशी शक्यता वर्तवली आहे. पनवेल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम भगवान यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हेगाराचा शोध घेतला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >>समीर वानखेडेंना थेट परदेशातून आली जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT