Crime : ”बलात्कार झाल्याचं कोणालाच सांगू नको, नाहीतर…”, पोलिसांनीच पीडितेला…
या घटनेत पीडिता बलात्काराची तक्रार दाखल करायला पोलीस ठाण्यात आली होती. मात्र थेट पोलिसांनी बलात्कार झालाय हे कोणाला सांगु नको,असा अजब सल्ला दिला आहे. या घटनेने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय.
ADVERTISEMENT
देशातील बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कायदा तितका कठोर पाहिजे व पोलीस प्रशासनाने देखील त्यावर तत्काल कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर पोलिसांनी देखील पीडितेला सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र तसे या घटनेत तरी होताना दिसत नाही. कारण या घटनेत पीडिता बलात्काराची तक्रार दाखल करायला पोलीस ठाण्यात आली होती. मात्र थेट पोलिसांनी बलात्कार झालाय हे कोणाला सांगु नको,असा अजब सल्ला दिला आहे. या घटनेने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. (police told gangrape victim dont tell anyone you were raped shocking story kanpur uttar pradesh)
कानपूरमध्ये ही लाजिरवाणी घटना घडली आहे. कानपूरच्या सचेडी परीसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याची मुलगी त्याच्या दोन भावांसोबत गुरूवारी जत्रा पाहायला गेली होती. जत्रा पाहुन घरी परतत असताना दोन तरूण बाईकवरून तिच्याजवळ आले. या तरूणांनी मुलीची छेड काढायला सुरुवात केली होती. या छेडछाडीनंतर तरूणांनी तिला एका प्लांटमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तरूणांनी पळ काढला होता.
हे ही वाचा : Hemant Patil : मराठा आरक्षणासाठी शिवसेना नेत्याने दिला खासदारकीचा राजीनामा
या घटनेनंतर मुलीची कशीबशी भेट तिच्या आईशी झाली. त्यानंतर पीडितेने हा संपूर्ण घटनाक्रम आईला सांगितला होता.यानंतर आईने पीडितेसोबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कानपूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर माय लेकींनी पोलिसांना बलात्काराची तक्रार दाखल करण्याची माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी ‘आता छेड काढल्याची तक्रार दाखल करून घ्या आणि कोणाला सांगू नका बलात्कार झालाय’. नाहितर तुझी बदनामी होईल आणि तुझ्याशी कुणी लग्न करणार नाही. आणि ही लोक 3 महिन्यांची सुटतील, असा अजब सल्लाच पीडितेला पोलिसांनी दिला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, पोलिसांनी बलात्कार प्रकरणात एफआयआर दाखल करण्याऐवजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळीही आई आणि मुलगी पोलिसात जाऊन आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास सांगितले होते. पण पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली होती. आणि बलात्काराबद्दल कुणालाही सांगू नका. मेडिकल करून द्या.. आता छेड काढल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मेडिकलनंतर गुन्ह्याचे कलम वाढवू असे पोलीसांनी सांगितले होते.
हे ही वाचा : ‘अश्लील पोस्ट लाइक करणं गुन्हा नाही’, पण…, न्यायालयाच्या निकालात काय?
या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी यापूर्वी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आता त्यांच्यावर बलात्काराचा आरोप होत आहे. वैद्यकीय अहवाल येऊ द्या, त्यानंतर कलम वाढवले जाईल, असे पोलिसांना सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT