महाराष्ट्र TET पेपरफुटीचा मुख्य आरोपी अटकेत, आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक

मिथिलेश गुप्ता

Maharashtra TET Paper : देशभरात नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरू आहे, अशातच आता भिवंडीत TET पेपरफुटी प्रकरणाची 18 जूनची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांनी या हाय-प्रोफाइल प्रकरणी कथित मुख्य सुत्रधार असलेल्या बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना बिहारहून अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणी एकूण 12 जणांना अटक केली आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra TET Paper
Maharashtra TET Paper
Google CTA

बातम्या हायलाइट

point

TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या ही 14 वर

point

भिवंडी पोलिसांचा सखोल तपास

Maharashtra TET Paper : देशभरात नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरू आहे, अशातच आता भिवंडीत TET पेपरफुटी प्रकरणाची 18 जूनची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांनी या हाय-प्रोफाइल प्रकरणी कथित मुख्य सुत्रधार असलेल्या बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना बिहारहून अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणी एकूण 12 जणांना अटक केली आहे. 

हे ही वाचा : Astrology : बुधाचा मिथुन राशीत उदय, 'या' राशींना फायदा तर काही राशींवर संकट

TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या ही 14 वर

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात चौकशीतून एकूण आरोपींची संख्या ही 14 वर पोहोचली आहे. यापूर्वी 12 जणांना अटक करण्यात आली होती. पेपरफुटीची खात्री झाल्यानंतर 28 जून रोजी होणारी महाराष्ट्र TET परीक्षा आता तात्काळपणे पुढे ढकलण्यात आली होती. या घटनेनं शिक्षण आणि परीक्षा प्रणालीच्या पारदर्शकतेबाबत राज्यभरात एकच चिंता व्यक्त केली जात आहे. 

भिवंडी पोलिसांचा सखोल तपास

भिवंडी पोलीस आता या रॅकेटच्या जाळ्यात सखोल तपास करत आहेत, इतर संभाव्य संशयिताची ओळख पटवणे आणि पेपरफुटीत सहभागी असलेल्याच्या भूमिकांची देखील पडताळणीचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्यांच्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचली गेली असली, तरीही त्या व्यक्तींचा शोध घेण्याचा आणि कटकारस्थानामागील टोळीची व्यप्ती निश्चित करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. 

हे ही वाचा : 'सत्ताधारी खासदारांची मुलं सांगताहेत तुमचं चुकतंय' विशाल पाटलांनी सांगितल्या आतल्या गोष्टी!

दिल्लीसह देशभरात नीट पेपरफुटीवरून आंदोलन

दरम्यान, गेली काही दिवस दिल्लीसह देशभरात नीट पेपरफुटीवरून आंदोलन सुरू करण्यात आलं. सोनम वांगचुक यांनी 27 व्या दिवशी जे.पी. नड्डा यांच्या हातून उपोषण सोडलं. त्यानंतर भिंवडीतून TET पेपरफुटीवरून बिहारच्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामुळे आता सरकारच्या शैक्षणिकदृष्ट्या कारभाराचा गोंधळ समोर आला आहे.