Video: पुण्यात पोलिसासमोरच कोयता गँगची दहशत, दोन गटाच्या वादात कोयत्याने हल्ला

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pune crime news koyta gang three were stabbed wadgaon sheri area video viral
pune crime news koyta gang three were stabbed wadgaon sheri area video viral
social share
google news

Pune Koyta Gang Wadgaun Sheri : विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत दिसून आली आहे. वडगाव शेरीमध्ये कोयता गँगने काही तरूणांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे एका महिला कॉस्टेबलसमोरच हा संपूर्ण घटनाक्रम घडलाय. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओमुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत दिसून आली आहे. (pune crime news koyta gang three were stabbed wadgaon sheri area video viral)

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या दहशती वाढल्या आहेत.आता वडगाव शेरी भागात कोयता गँगने दहशत माजवली होती. या संदर्भातला व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता काही तरूणांचे भांडण सूरू आहेत. या दरम्यानच मागून कोयता गँगचा एक सदस्य कोयता घेऊन येतो. आणि भांडण करत असलेल्या तरूणांवर जोरदार हल्ला चढवतो.यावेळी कोयता गँगचा हा सदस्य कोयत्याने सपासप वार करताना दिसत आहे.

हे ही वाचा : ‘मुंबईकडे कूच करणार…’ जरांगेंची घोषणा; महाजन म्हणाले,’…जायची गरजच पडणार नाही’

घटनाक्रम काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ पाडळेचा मित्र ऋषिकेश ढोरे याचे आकाश नावाच्या मुलाशी भांडण झाले होते. याच भांडणाचा वाद मिटवण्यासाठी सौरभ मित्रांसह वडगाव शेरीतील दिगंबरनगर भागात आला होता.त्यावेळी आकाशने सौरभला मारहाण करायला सुरुवात केली.त्यानंतर आकाशच्या मित्र अनुजने ऋषिकेशवर कोयत्याने वार केले.इतकचं नाही तर आरोपींनी त्यांना शिविगाळ केली आणि त्याला जिवंत सोडू नका म्हणत त्याच्यावर दगडफेकही केली. या दरम्यान सौरभचा मित्र अभी आगरकर आणि योगेश हे ऋषिकेशला वाचवण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या दरम्यान घटनास्थळी एक महिला कॉस्टेबल देखील उपस्थित होती. मात्र तिला हा वाद मिटवण्यात यश आले नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणी आता सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी सराईत चार आरोपींना अटक केली आहे. अनुज जितेंद्र यादव, हरिकेश टूणटूण चव्हाण (18), आकाश भरत पवार ((23), अमोल वसंत चोरघडे 30 अशी या आरोपींची नाव आहे. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत कोयता गँगची दहशत दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ram Mandir : “उद्धव ठाकरेही अयोध्येला जाणार, पण…”, राऊतांनी सांगितला प्लॅन

    follow whatsapp

    ADVERTISEMENT