1.5 कोटी कमावलेल्या PSI ची लागली वाट, ऑनलाइन गेमिंगमुळेच झाला ‘गेम’
ऑनलाईन गेम खेळून करोडपती झालेल्या पीएसआयच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे. पोलीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असून त्यांनी वर्दीवर ऑनलाईन गेम खेळण्याचे समर्थन केले होते, त्यामुळे भाजपच्या नेत्याने थेट तक्रार केली आहे.
ADVERTISEMENT
Pimpari Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (PSI Somanath Zende) यांना ऑनलाइन गेममधून (Online Game) दीड करोड रुपयांचे बक्षीस (1.5 crore) मिळालं आहे. मात्र पोलीस उपनिरीक्षक असलेल्या झेंडे यांचा एवढ्या मोठी रक्कम जिंकल्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण आता त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने एवढ्या मोठ्या रक्कमेचे बक्षीस मिळाल्यामुळे आता त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
गणवेशात दिली मुलाखत
सोमनाथ झेंडे हे सरकारी कर्मचारी असून त्यांना अशा प्रकारे ऑनलाईन गेम खेळण्याची परवानगी आहे का याबाबत आता चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर गणवेशामध्ये दिलेल्या मुलाखतीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
हे ही वाचा >> समीर वानखेडेंना थेट परदेशातून आली जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?
ऑनलाइन गेमचे उदात्तीकरण
या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून त्यांच्यावर आता कारवाई होणार की नाही याचा निर्णय आता होणार आहे. तर, दुसरीकडे भाजपचे सरचिटणीस यांनीदेखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस उपनिरीक्षकाने ऑनलाइन गेम खेळून जुगाराचे उदात्तीकरण केल्याची तक्रार दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानेच पोलीस उपनिरीक्षकाची चौकशीचे आदेश दिल्याचा दावा भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी केला आहे.
हे वाचलं का?
कारवाई होणार की नाही
सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई होणार की नाही हे अजून निश्चित झाले नाही. मात्र त्यांना बक्षीस मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की, ऑनलाईन गेमिंग म्हटलं जोखीम असते. त्यामुळे या गेमपासून आपण सावधदेखील राहिले पाहिजे असं आवाहनही त्यांनी मुंबईतकच्या माध्यमातून केलं आहे. त्यामुळे आता झेंडे यांचे नेमके काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
हे ही वाचा >> पालघर: पत्नी पतीला निरोप द्यायला गेली अन् काळाने साधला डाव; चिमुकलीचा करुण अंत
पोलीस आयुक्तांचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून त्यांची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासूनच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT