Crime News: आईने मुलीला बॉयफ्रेंडसोबत 'नको त्या' अवस्थेत पाहिलं अन्...
Raigad Crime : रायगडच्या खालापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. पोटच्या पोरीनं बोयफ्रेंडच्या मदतीनं जन्मदाच्या आईचा जीव घेतला. एवढचं करुन ती थांबली नाही, पुढे तिने जे केलं ते अंगावर काटा आणणारं होतं, रायगडमध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
रायगडच्या खालापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली
पोटच्या पोरीनं बोयफ्रेंडच्या मदतीनं जन्मदाच्या आईचा जीव घेतला
मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आईने आत्महत्या केल्याचा रचला बनाव
Crime News: भरत गोरेगावकर, रायगड : प्रेम... प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते. हेच प्रेम अती झालं तर जीवावर उठतं. याच प्रेमाने अनेकांचे बळी घेतलेत. कधी प्रियकरच रागाच्या भरात प्रेयसीला मारुन टाकतो तर कधी सुटका म्हणून तिच बिचारी आपलं जीवन संपवते. याच आंधळ्या प्रेमाच्या नादात रक्ताच्या नात्यालाही संपवायला माणूस मागे पुढे पाहात नाही. रायगड जिल्ह्यातल्या खालापूरमध्येही अशीच एक थरारक घटना घडली आहे. पनवेलमध्ये पोटच्या पोरीनं आईची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना ताजी असतानाचा आता रायगडच्या खालापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. पोटच्या पोरीनं बोयफ्रेंडच्या मदतीनं जन्मदाच्या आईचा जीव घेतला. एवढचं करुन ती थांबली नाही, पुढे तिने जे केलं ते अंगावर काटा आणणारं होतं, रायगडमध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर गावात संगीता मारुती झोरे वय 42 या आपल्या दोन मुलींसह राहत होत्या. १० सप्टेंबर हा संगिता यांच्यासाठी शेवटचा दिवस ठरला. एका आईने पोटच्या पोरिच्या हातून आपला अशा प्रकारे जीव जाईल याची कधी कल्पनाच केली नसेल. संगीता यांची मोठी मुलगी भारती जिचं वय 20 वर्ष होतं तिचा बॉयफ्रेंड दत्तात्रय नांदगावकर राहणार वावोशी हा रात्रीच घरी आला होता. आईला याची जराही कल्पना नव्हती.
हेही वाचा : Gold Rate: बाप्पाचीच कृपा! आज सोन्याचे भाव चक्क घसरले... 24 कॅरेट सोन्याची किंमत माहितीये का?
आईने दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठून जे पाहिलं त्यानंतर जे झालं ते कुठल्याच आईच्या वाट्याला येऊ नये. 10 सप्टेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून जाग आली. त्यांना घरात कुणीतरी असल्याचा संशय आला. त्या जेव्हा उठल्या तेव्हा त्यांनी आपली मुलगी भारती हिचे बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध सुरु असताना पाहिलं. यानंतर पुढे काय करावं त्यांना सुचलं नाही.
हे वाचलं का?
संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. हे पाहता मुलीच्या बॉयफ्रेंडने त्यांचं तोंड दाबून धरलं. त्यांना जमीनीवर खाली पाडून तोंडावर घरातील ब्लॅन्केट दाबून धरलं. मुलगी भारतीने आई संगीताचे पाय धरुन ठेवले. श्वास कोंडल्याने संगीता यांचा जागीच मृत्यू झाला. पोटच्या पोरिंन बॉयफ्रेंडच्या मदतिनं जन्मदात्या आईला संपवलं. एवढंच करुन ती थांबली नाही तर खून केल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आई संगीता यांचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपाला लटकवला त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो 'या' गोष्टी अजिबात विसरू नका! झटपट जमा होतील 4500 रुपये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यानंतर त्याच मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या आईने आत्महत्या केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केल्यावर मुलीचे वर्तन संशयास्पद आढळले. संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा हिने सुद्धा घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला होता. त्यानुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत.
ADVERTISEMENT
एकूणच आपण बघितलं तर अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. आता पोटच्या आईलाच प्रेमाच्या नादात संपवलं जातंय. पनवेलमध्येही अशी घटला घडली होती. मुलीने आपल्या आईची सुपारी देऊन हत्या केली होती. त्यानंतर अंगावर काटा आणणारी ही घटना घडली. दोन दिवसांच्या प्रेमासाठी 9 महिने पोटात ठेवलेल्या आईच्या जिवावर ही मुलगी उठली. कारण काय तर आईने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT