गळा, हात आणि पायांवर कुऱ्हाडीने सपासप वार, मजुरीवरुन घरी आलेल्या बायकोला नवऱ्याने संपवले; नेमकं कारण काय?

मुंबई तक

एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत तिचा शेवट केला आहे. मजूरी करुन थकून आल्यानंतर ती घरात झोपली होती. हीच संधी साधत पतीने पत्नीला संपवले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

गळा, हात आणि पायांवर कुऱ्हाडीने सपासप वार

point

मजुरीवरुन घरी आलेल्या बायकोला नवऱ्याने संपवले

point

हत्येचं नेमकं कारण काय?

Crime News : एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली आहे.  कामावरुन थकून आल्यानंतर पत्नी झोपी गेली होती. याचवेळी नराधम पतीने डाव साधत पत्नीचा शेवट केला. कालूराम मीणा असे आरोपी पतीचे नाव असून रविवारी (5 एप्रिल) संध्याकाळी त्याने ही हत्या केली. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ही घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

झोपेत असलेल्या पत्नीवर सपासप वार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कालूराम हा शेळी पालनाचे काम करतो. रविवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास तो शेळ्यांना फिरवून घरी परतला. त्यावेळी त्याची पत्नी पुनी देवी शेतात मजुरी करून घरी आली होती आणि थकव्यामुळे घरात झोपली होती. याच दरम्यान कालूरामने रागाच्या भरात कुऱ्हाड उचलली आणि झोपेत असलेल्या पत्नीवर सपासप वार केले. त्याने तिच्या मानेवर, हातावर आणि पायावर इतके वार केले की पुनी देवीचा जागीच मृत्यू झाला. तरीही तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हे ही वाचा : बिझनेसमनच्या मुलाने बेदरकारपणे कार चालवली, फाईव्ह स्टार हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा जीव गेला

पोटच्या मुलाचीही हत्या

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कालूरामला ताब्यात घेतले. मृत महिलेचा भाऊ धनपाल मीणा याने मालाखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपासात आरोपीबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आरोपी कालूराम हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याने आपल्या पोटच्या मुलाची आणि अन्य एका व्यक्तीची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या खुनी इतिहासामुळे गावात अधिकच भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत.

हे ही वाचा : कोविड लॉकडाऊनमध्ये दुकान उघडं ठेवल्याने अटक, पोलीस कोठडीत बाप-लेकाचा जीव घेतला; 9 पोलिसांना फाशीची शिक्षा

हत्येचे नेमके कारण काय?

मृतदेहाचे पोस्ट मार्टम करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुनी देवी अत्यंत साध्या स्वभावाची महिला होती आणि घरात कधीही मोठे वाद झाल्याचे ऐकिवात नव्हते. असे असतानाही कालूरामने इतके क्रूर कृत्य का केले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मालाखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी हरदयाल सिंह यादव यांनी सांगितले की, आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या हत्येमागचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
 

हे वाचलं का?