Crime News: किर्रर.. अंधारात गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् तरुणाचा जीवच गेला!
मध्यरात्री आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकरला कुटुंबीयांनी पकडून त्याला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेल्यावर मात्र अनेक धक्कादायक माहिती उघड झाली.
ADVERTISEMENT
Murder Case : प्रेम करणं सोपं नसतं असं म्हटलं जाते, मात्र तरीही काही प्रेमवीर प्रेमात कोणतंही धाडस करायला तयार होत असतात. त्यामुळे कधी कधी प्रेमात केलेल्या धाडसामुळे सगळंच प्रकरण अंगलट येत असते. त्यातून कधी कधी मोठा अनर्थही घडत असतो. असाच एक अनर्थ एका प्रेमप्रकरणात घडला आहे, आणि त्यामध्ये प्रियकराचा हाकनाक जीवही (Death) गेला आहे. राजस्थानमध्ये असाच एक भयंकर प्रकार पाहायला मिळाला आहे. प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला तिच्या कुटुंबीयांतील व्यक्तींनी मारहाण (Beaten) करुन त्याची हत्या (Murder) केली आहे. ही घटना राजस्थानमधील सांचोर जिल्ह्यात (Sanchor, Rajasthan) घडली आहे.
ADVERTISEMENT
प्रेयसीला भेटला अन्…
प्रेमात असलेला प्रियकर रविवारी सायंकाळी चितळवण परिसरात राहणाऱ्या प्रेयसीला भेटायला गेला होता. त्यावेळी तिच्या कुटुंबीयातील सदस्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मृत्यूनंतर आता तपास वेगाने सुरू केला आहे.
हे ही वाचा >> Crime : संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; तरूणासोबत बर्थडे पार्टीत…
कुटुंबीयांचा गाठली हद्द
प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर प्रेयसीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 27 वर्षाचा तरुण नरेंद्र धोबी हा रविवारी संध्याकाळी रनोदर गावातील त्याच्या प्रेयसीला तो भेटायला गेला होता. त्यावेळी प्रेयसीच्या घरातील लोकांनी मारहाण करुन त्याची हत्या केली.
हे वाचलं का?
प्रेमसंबंधाला आधीच नकार
प्रेयसीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर परिसरातील लोकांनी त्याला रुग्णालयातही दाखल केले होते. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. या प्रकरणी मुलीसह तिच्या घरातील 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मृत झालेला युवक हा विवाहित असल्याचे मुलीला माहिती नव्हते असंही तिने आता सांगितले आहे. मात्र या दोघांचे प्रेमसंबंध मुलीच्या घरात समजल्यापासून घरचे या दोघांवरही नाराज होते. मात्र या प्रकरणात तरुणाचा मृत्यू झाल्याने गुन्हा नोंदवून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा >> Dharmveer 2 : ‘सिनेमा आवडो न आवडो आता…’,CM शिंदेंचा ठाकरेंना टोला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT