PNG jewellers : पुण्यातील पीएनजी ज्वेलर्सच्या कॅलिफोर्नियातील शोरुमवर दरोडा! पाहा CCTV व्हिडीओ
Robbery in PNG Jewellers : अमेरिकेतील सनी व्हॅली येथे असलेल्या पुण्यातील प्रख्यात पीएनजी ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी चोरी केली आहे. जवळपास 20 दरोडेखोर मास्क घालून शोरूममध्ये घुसले, त्यानंतर तोडफोड करून सोन्या-चांदीचे दागिने लुटले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अमेरिकेत पुण्यातील प्रख्यात पीएनजी ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी चोरी केली
दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या शोरूमवर हल्ला केला आणि दागिने लुटले
20 हून अधिक दरोडेखोरांनी हा हल्ला केला
PNG Jewellers Robbery in America : अमेरिकेतील सनी व्हॅली येथे असलेल्या पुण्यातील प्रख्यात पीएनजी ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी चोरी केली आहे. जवळपास 20 दरोडेखोर मास्क घालून शोरूममध्ये घुसले, त्यानंतर तोडफोड करून सोन्या-चांदीचे दागिने लुटले. याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चोरीची ही घटना 12 जून रोजी दिवसाढवळ्या घडली आहे. माहितीनुसार, बे एरियामध्ये गेल्या सहा आठवड्यात भारतीय ज्वेलर्स लुटण्याची ही तिसरी घटना आहे. (robbery in famous pune png jewellers which located in sunny valley america)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात PNG ज्वेलर्सचे प्रख्यात नाव आहे. भारतीयांच्या मालकीचे असलेल्या पीएनजी ज्वेलर्सचे शोरूम अमेरिकेतील एल कॅमिनो रिअल कॉम्प्लेक्समध्ये आहे. 12 जून रोजी, 20 हून अधिक दरोडेखोरांनी दुपारी 1.30 च्या सुमारास शोरूमवर हल्ला केला, तोडफोड केली आणि दागिने लुटले. त्यानंतर सर्व आरोपी कारमधून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ दाखल झाले.
हेही वाचा : Vidhan Sabha Election 2024: वडेट्टीवारांसाठी गुड न्यूज, पुन्हा होणार आमदार?
सनी व्हॅली विभागाच्या पोलीस सुरक्षा विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'पोलिसांना फोन आला आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पण, तोपर्यंत दरोडेखोरांनी अनेक वाहनांमधून पळ काढला होता. तसंच या सर्वात कोणालाही कसली इजा झालेली नाहीये.' अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे
हे वाचलं का?
हेही वाचा : Vidhan Sabha Election 2024: वडेट्टीवारांसाठी गुड न्यूज, पुन्हा होणार आमदार?
यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सूचना दिल्याने सॅन फ्रान्सिस्को किनारपट्टीच्या दिशेने जाणाऱ्या दोन संशयित गाड्यांचा पाठलाग केला. या दोन्ही गाड्या अत्यंत वेगाने असल्याने त्या काही वेळातच दिसेनाशा झाल्या. मात्र पोलिसांच्या सहयोगी यंत्रणांनी रेडवुड सिटीजवळ एका गाडीचा शोध लावला. यावेळी पाच दरोडेखोरांना पोलिसांनी शिताफीने पकडले.
हेही वाचा : राणे थेट म्हणाले, 'कोकणातून मी शिवसेना संपवली..' नेमकं कोणाला डिवचलं?
टोंगा लातू, तावाके इसाफे, ओफा अहोमाना, किल्फी लिआटोआ आणि अफुहिया लावाकिहओ अशी त्यांची नावे आहेत. त्यांना विविध गुन्ह्याखाली साता क्लारा कौंटी तुरुंगात ठेवले आहे. त्यांच्यावर दरोडा आणि वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT