Brahmapuri Vidhan Sabha Election 2024: विजय वडेट्टीवारांसाठी गुड न्यूज, पुन्हा होणार आमदार?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

विधानसभा निवडणूक 2024: विजय वडेट्टीवारांसाठी गुड न्यूज
विधानसभा निवडणूक 2024: विजय वडेट्टीवारांसाठी गुड न्यूज
social share
google news

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Brahmapuri Constituency: ब्रम्हपुरी: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेत कोण सत्ता मिळवणार याची चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीबाबत आतापासूनच अंदाज व्यक्त केला जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा ब्रम्हपुरी हा विधानसभा मतदारसंघ नेमका कुणाचा, या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच मिळणार आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विधानसभेत हा मतदारसंघ कोणाकडे जाणार याचा अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तविणार आहोत.. (brahmapuri vidhan sabha election 2024 analysis of result and impact congress bjp mla vijay wadettiwar)

गडचिरोली-चिमूरमधील काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांनी तब्बल 1 लाख 41 हजार 696 मताधिक्याने विजय मिळवला. दुसरीकडे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना केवळ 4,76,096 मतं मिळाली. पण या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, विधानसभेसाठी विजय वडेट्टीवार यांचा मार्ग सुकर झाला आहे.

हे ही वाचा>> ''देवेंद्र फडणवीसांचा दंगली घडवण्याचा कट होता'', काँग्रेस खासदाराचा खळबळजनक आरोप

विधानसभा निवडणूक ही विजय वड्डेटीवार यांच्यासाठी यामुळे काहीशी सोप्पी ठरू शकते, असं येथे झालेल्या मतदानातून समजतं आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलंय, हे आपण समजून घेऊया.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत झाली. भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून अशोक नेते यांना उमेदवारी दिली होती. जे विद्यमान खासदार होते. तर काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली होती. पण या मतदारसंघात नामदेव किरसान यांनी मोठा उलटफेर घडवत विद्यमान खासदार अशोक नेते यांचा प्रचंड मोठ्या मताधिक्याने पराभव केला. 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांचा ब्रम्हपुरी हा मतदारसंघ देखील येतो. जिथे काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान यांना बरंच चांगलं मताधिक्य मिळालं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> शिंदे गटातील आमदारांना पक्षात घेणार का? ठाकरे स्पष्टच बोलले

विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?

  • नामदेव किरसान (काँग्रेस) - 1 लाख 08 हजार 036  मतं मिळाली
  • अशोक नेते - 84 हजार 522 मतं मिळाली

2019 विधानसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 96 हजार 726 मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या संदीप गड्डमवार यांना 78 हजार 177 मिळाली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT