सांगली : प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, प्रेमविवाह अन् 2 मुलं असूनही मोठं कांड

मुंबई तक

sangli murder case : सांगलीतील विश्रामबाग परिसरात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी संशयावरून तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

sangli murder case
sangli murder case
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली : प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

point

प्रेमविवाह अन् 2 मुलं असूनही मोठं कांड

sangli murder case : सांगलीतील विश्रामबाग परिसरात पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने रचल्याचे तपासात उघड झाले. प्रेमविवाह करून संसार सुरू केलेल्या या दाम्पत्याला दोन मुले असूनही पत्नीने प्रियकराच्या मदतीने हे मोठं कांड केल्याचं पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. 

विश्रामबाग पोलिसांनी संशयाच्या आधारे केलेल्या कसून तपासानंतर या खुनाचा उलगडा झाला असून मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. आनंद हणमंत सर्जे (वय 28, रा. पोळमळा, सांगली) असे मृत पतीचे नाव आहे.

हेही वाचा : माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला, माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?

आनंदच्या गळ्यावर खुणा दिसल्या अन् संशय बळावला 

आनंद सर्जे हा सांगली शहरातील एका ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. तो पत्नी आणि दोन मुलांसह पोळमळा परिसरात राहत होता. गुरुवारी पहाटे पत्नी आणि मेहुण्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डॉक्टरांनी याची माहिती दिल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी आनंदच्या गळ्यावर ओरखड्यांच्या खुणा आढळल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासाची दिशा बदलत अधिक चौकशी सुरू केली.

हे वाचलं का?