Satara Crime : कर्करोगाच्या भीतीपायी पोटच्या पोरालाच संपवलं, साताऱ्यात काय घडलं?

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

satara crime news father killed his son death over cancer fear shocking crime story
satara crime news father killed his son death over cancer fear shocking crime story
social share
google news

Satara Crime News ; साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आपल्याला कर्करोग (Cancer) झाला असून तो आपल्या मुलासही होईल या भीतीने एका पित्याने (Father) आपल्याच पोटच्या पोराची (Son) गळा आवळून हत्या (killed) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ असे या 12 वर्षीय मुलाचे नाव होते. या प्रकरणी वाठार पोलीस (wathar Police) आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त तपास करून या खुनाचे धागेदोरे उलगडले आहेत. या प्रकरणी संशयित वडील विजय खताळ याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने सध्या सातारा हादरलं आहे.

हिवरे गावच्या हद्दीत उसाच्या शेतात 12 वर्षीय विक्रमचा मृतदेह आढळला होता. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा देखील दाखल केला होता. तसेच या घटनेचा तपास करायला सुरूवात केली होती. यावेळी 12 वर्षीय मुलाची नेमकी हत्या कोण करेल असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला होता.

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : ‘वंचित’ने सांगितलं किती हव्यात जागा? मांडला ‘मविआ’चा फॉर्म्युला

या प्रकरणाचा वाठार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त तपास करत होती. या तपासा दरम्यान अनेक अनेकांची चौकशी केली होती.तसेच या प्रकरणात पोलिसांनी विक्रमचे वडिलांची देखील चौकशी केली होती. या तपासा दरम्यान मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती आणि साक्षीदारांनी दिलेल्या माहिती मोठी तफावत आढळली होती. त्यामुळे पोलिसांना वडिलांवर संशय बळावला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याच संशयातून पोलिसांनी विक्रमच्या वडिलांच्या कसून तपास केला होता. या तपासा दरम्यान वडिलांनी हत्येची कबूली दिली होती. यावेळी पोलिसांना हत्येमागचं कारण सांगताना विक्रमचे वडील म्हणाले,आपल्याला कर्करोग झाला असून तो आपल्या मुलासही होईल या भीतीतून त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती आरोपी वडिलांनी पोलिसांना दिली. आरोपी वडिलांनी दिलेली ही माहिती ऐकूण पोलिसांना देखील बसला होता.

या प्रकरणात आता संशयित विजय खताळ याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lok Sabha Elections : मत पेरणी! शिंदे सरकारने मदरशांसंदर्भात घेतला मोठा निर्णय

    follow whatsapp

    ADVERTISEMENT