Lok Sabha 2024 : ‘वंचित’ने सांगितलं किती हव्यात जागा? मांडला ‘मविआ’चा फॉर्म्युला

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 seat sharing news : vanchit bahujan aghadi demanded 12 seats
lok sabha election 2024 seat sharing news : vanchit bahujan aghadi demanded 12 seats
social share
google news

MVA Seat Sharing formula for Lok Sabha election 2024 : वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक आहे. प्रकाश आंबेडकर गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीला आणि राज्यातील महाविकास आघाडीला यासंदर्भात लवकर निर्णय घेण्याचं आवाहन करत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत किती जागा हव्यात, असा प्रश्नही डोकं वर काढत आहे. याबद्दलचे चित्र स्पष्ट झालं आहे. सुजात आंबेडकरांनी एक ट्विट करत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अनेक मतदारसंघातील चित्र बदलून टाकलं. धक्का देणारे निकाल आले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याबद्दल राज्यातील महाविकास आघाडी आणि केंद्रातील इंडिया आघाडी गंभीर झाल्याचे दिसत आहे.

अलिकडेच दिल्लीत झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भात चर्चा झाली. आता वर्ष सरण्यापूर्वी त्याबद्दल निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. पण, अशात वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये किती जागा मिळणार हा यक्षप्रश्न कायम आहे. इंडिया आघाडीचाच अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षातच जागांचा तिढा असताना वंचित आल्यानंतर जागा वाटप कसं होईल, हा मुद्दा आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वंचितने सूचवला फॉर्म्युला…

वंचित बहुजन आघाडीने लोकसभेला किती जागा हव्यात याबद्दल पहिल्यांदाच बोलून दाखवलं आहे. वंचितचे सुजात आंबेडकर यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सूचवला आहे.

हेही वाचा >> “…मग मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही”, प्रकाश आंबेडकर ‘इंडिया’ला मेसेज

सुजात आंबेडकर त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, “झटपट गणित… 12 + 12 + 12 + 12 = ?” सुजात आंबेडकरांनी मांडलेल्या फॉर्म्युल्यानुसार अशा पद्धतीने जागा वाटप झाल्यास चार पक्षांना प्रत्येकी 12 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीत जागावाटपाच कसे असेल, याबद्दलची चर्चा सुरू असताना सुजात आंबेडकरांनी हे ट्विट केलं आहे. त्यामुळे वंचित आघाडीला लोकसभेच्या 12 जागा हव्यात हे स्पष्ट झालं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

लोकसभा 2019 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने किती लढवल्या होत्या जागा?

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मोजक्या जागा आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तडजोडी कराव्या लागणार, असंच सध्या दिसत आहे.

हेही वाचा >> आढळराव पाटील अजितदादांसोबत जाणार? अमोल कोल्हेंना शह देण्यासाठी हालचाली

लोकसभा 2019 जागावाटपावर एक नजर टाकायची झाली, तर त्यावेळी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत नव्हती. शिवसेना भाजपसोबत होती. शिवसेनेच्या वाट्याला 23 जागा आल्या होत्या. तर भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. काँग्रेसच्या वाट्याला 24 जागा आल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागांवर लढली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 2, बहुजन विकास आघाडीला 1, तर युवा स्वाभिमानी पक्षाला 1 जागा आघाडीने दिली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT