हॉटेल बुक करून 'ती' करायची घाणेरड्या गोष्टी... चिअर लीडरने सांगितलं खळबळ उडवून देणारं सत्य!
2017 मध्ये लेस्टरच्या डी मॉंटफोर्ट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, सुरक्षेसंबंधी अभ्यास करताना नियाला प्रेरणा मिळाली. तिला जाणवलं की, जर तिने आवाज उठवला नाही, तर अवन दुसऱ्या मुलींचंही शोषण करेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

चिअर लिडरला कोचनेच छळलं

लहान होती तेव्हाच सुरू केला छळ

27 व्या वर्षी मिळाला न्याय
Cheerleader Crime News : इंग्लंडमधील लेस्टरशायर येथील निया डूरंटच्या आयुष्यातील एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी चीयरलीडिंग ग्रुपमध्ये काम सुरू केलेल्या नियाच्या आयुष्यात एक भयंकर अनुभव आलाय. तिची कोच रोसाना अवन हिनं तिचे यौन शोषण केलं. याचा नियाने अनेक वर्ष सामना केला. आता 27 वर्षीय निया हिने आपली कहाणी उघड केली असून, तिच्या कोचला अखेर 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
कसं झालं लैंगिक शोषण...
नियाला लहानपणापासूनच खेळ आणि जिम्नॅस्टिक्सची आवड होती. चीयरलीडिंग ग्रुपमध्ये प्रवेश मिळाल्याने ती आनंदात होती. तिची कोच रोसाना अवन हिने तिला विशेष प्रशिक्षणासाठी सकाळी लवकर येण्यास आणि संध्याकाळी उशिरापर्यंत थांबण्यास सांगितलं. नियाला यामुळे आनंद झाला, कारण तिला वाटलं, तिची कोच तिच्यावर विशेष लक्ष देत आहे. पण हा तिच्या आयुष्यातील सर्वात भयंकर काळ ठरला.
हे ही वाचा >> देवाच्या दारात चोरी! दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनं लाखो चोरले, 500 च्या नोटांचे बंडल कसे लपवायचा?
काही आठवड्यांच्या सरावानंतर अवनने नियाला वेगळे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यात तिने नियाला अयोग्य पद्धतीने स्पर्श करणं सुरू केलं. चीयरलीडिंग इव्हेंट्ससाठी बाहेर गेल्यावर अवन नियाला आपल्या खोलीत ठेवायची आणि रिसेप्शनवर तिचं नाव लपवायची. अवन नियाला सांगायची की, हे सर्व नॉर्मल आहे. यामुळे निया गोंधळात पडली आणि तिला भीती वाटू लागली की, सत्य सांगितल्यास ती अडचणीत येईल.
डायरीने उघड केलं सत्य
2013 मध्ये नियाच्या पालकांना तिची डायरी मिळाली, ज्यामध्ये तिने आपल्याला होणाऱ्या यातनांची नोंद केली होती. पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली, पण भीतीपोटी नियाने सत्य लपवलं आणि तक्रार मागे घेतली. अवनने पोलिसांसमोर आपण नियाचं चुंबन घेतल्याचं कबूल केलं. यासाठी तिला तंबी देण्यात आली होती.