WhatsApp वर ‘ते’ फोटो, लग्नाच्या दिवशीच नववधूने घेतला गळफास अन्…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

shocking incident in solapur where a young lady committed suicide on her wedding day due to constant harassment by a young man due to one sided love
shocking incident in solapur where a young lady committed suicide on her wedding day due to constant harassment by a young man due to one sided love
social share
google news

Solapur Young Lady Suicide: विजयकुमार बाबर, सोलापूर: सोलापूर शहर परिसरात नववधूने लग्नाच्या दिवशीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सालेहा महिबूब शेख (वय 25 वर्ष) असे नववधूचे नाव आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून प्रियकराने मित्रांसोबत घेत भयंकर त्रास दिला असल्याची माहिती नववधूचे वडील महिबूब शेख यांनी दिली आहे. प्रियकराने मित्रांना सोबत घेत सालेहाचे लग्न तोडण्याची धमकी दिली होती. (shocking incident in solapur where a young lady committed suicide on her wedding day due to constant harassment by a young man due to one sided love)

ADVERTISEMENT

सालेहा शेख हिने विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. एकतर्फी प्रेम प्रकरणात त्रास होत असल्याची लेखी तक्रारही तिने दाखल केली होती. तीन संशयितांचे नावे देखील तिने लेखी तक्रारीत नमूद केली होती.

प्रियकराचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. प्रियकराने नववधूच्या होण्याऱ्या पतीला देखील फोन करून धमकी दिली होती. तसेच अश्लील फोटो WhatsApp च्या माध्यमातून वधूच्या पतीला पाठवले होते. अखेर सालेहा शेख हिने लग्नाच्या दिवशीच टोकाचे पाऊल उचलले आणि राहत्या घरात सोमवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> गोळ्या झाडून डोळे काढले, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये…, पुजाऱ्याची केली क्रूर हत्या

सालेहाचे लग्न असल्याने सर्व पाहुणे मंडळी घरात होती. रविवारी रात्री सालेहा शेख हिला हळद लावण्यात आलेली होती. पण त्याच दिवशी हळद लागलेली नववधू गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून घरातील पाहुण्यांना, नातेवाईकांना आणि आई-वडिलांना जबर धक्का बसला.

नववधूच्या आत्महत्येने सोलापूर हळहळले

सालेहा शेख हिने डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते. नातेवाईंकामधील एका उच्च शिक्षित तरुणासोबत तिचे लग्नही जुळले होते. लग्नानंतर सोलापूर सोडून नव्या शहरात नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती. सोमवारी दुपारी शहरातील एका मंगल कार्यालयात मुस्लिम रितीरिवाजा प्रमाणे लग्न होणार होते.

ADVERTISEMENT

दरम्यान, दोन दिवसांपासून एकतर्फी प्रेम करणारा प्रियकर व त्याचे मित्र हे नववधू सालेहा शेख हिला लग्न मोडण्याची धमकी देत होते. भर लग्नात येऊन गोंधळ करतील,आई-वडिलांच्या इज्जतीवर प्रश्न उपस्थित होतील. वर आणि वऱ्हाड मंडळी लग्न कार्य न करताच परत जातील. अशी भीती सालेहाच्या मनात होती. रविवारी रात्री मोठ्या आनंदाने हळदी कार्य झाले. मध्यरात्रीपर्यंत हळदीचे कार्यक्रम संपले आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास नववधू सालेहा हिने टोकाचे पाऊल उचलले.

ADVERTISEMENT

नववधूला झोपेतून उठवण्यासाठी आई तिच्या खोलीत गेली असता,नववधू मुलगी सालेहा ही घराच्या सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने लग्नाच्या दिवशीच आपली जीवनयात्रा संपवली होती.

एकतर्फी प्रेम प्रकरणात धमकी, अश्लील व्हिडीओ व्हायरलबाबत पोलिसात तक्रार

सालेहा शेख हिने 15 डिसेंबर 2023 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या नावे पत्र लिहिले होते. ‘एकतर्फी प्रेम प्रकारणातून घराजवळील तरुण व त्याचे मित्र मला त्रास देत आहेत. माझ्या फोटोचा दुरुपयोग करून अश्लील फोटो तयार करून माझ्या नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत आहेत. माझे लग्न मोडण्याची धमकी देत आहेत. मला न्याय द्यावा आणि धमकी देणाऱ्या तरुणांविरोधात कडक कारवाई करावी असे पत्र स्वतः नववधूने लिहिले होते. आता ते पत्र समोर आले आहे.

विजापूर नाका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या प्रकरणी कसून तपास करत आहेत. तसेच संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत. नववधूचे वडील महिबूब शेख व इतर नातेवाईक शासकीय रुग्णालयात ठाण मांडून बसले आहेत. जोपर्यंत संशयित आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

हे ही वाचा>> Priya Singh ची जबरदस्तीनं सही घेतली? पोलिसांच्या भूमिकेवरच संशय

‘लग्न मंडपात जाण्याऐवजी मुलीला पोस्टमार्टमसाठी आणलं’

सालेहा शेख हिचे वडील महिबूब शेख यांना दुःख अनावर झालं. मुलीसाठी खूप काबाडकष्ट केले आणि तिला उच्चशिक्षित केले. आज मुलीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. लाखो रुपये खर्च करून मुलीच्या लग्नाची तयारी केली होती. मुलीसाठी बापाने सर्व लाड पुरवले होते. लग्न मंडपात नववधूला घेऊन जाण्याची सर्व तयारी केली, मात्र ऐनवेळी घात झाला आणि मुलीचा मृतदेह घेऊन पोस्टमार्टमसाठी आलो अशी धक्कादायक आणि दुःखदायक कहाणी वडिलांनी शासकीय रुग्णालयात सांगितली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT