'आरोपी अक्षय शिंदे मुलींच्या टॉयलेटमध्ये...', बदलापूर प्रकरणाच्या सर्वात धक्कादायक रिपोर्टने खळबळ!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Badlapur Crime Latest Update
Badlapur Crime Latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

point

आरोपी अक्षय शिंदेला शाळेत कशी मिळाली नोकरी?

point

बाल हक्क आयोगाने शालेय प्रशसानाला विचारला जाब

Badlapur Crime News Latest Update: बदलापूरच्या नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखला करत आरोपी अक्षय शिंदेला अटक केली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे (विशेष तपास पथक) सोपवण्यात आला असून दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलींवर पंधरा दिवसांपासून अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक अहवाल सूत्रांच्या माध्यमातून समोर आला आहे. (the police registered a crime under the POCSO Act and arrested the accused Akshay Shinde.The case was handed over to the SIT (Special Investigation Team) and shocking revelations are coming out every day)

ADVERTISEMENT

आरोपीला मुलींच्या टॉयलेटमध्ये होती फ्री एन्ट्री

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाती आरोपी अक्षय शिंदेला ओळखपत्र नसतानाही शाळेतील आवारात आणि मुलींच्या टॉयलेटमध्ये फ्री एन्ट्री दिली जायची. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी न तपासता आरोपी अक्षयला १ ऑगपासून कंत्राटी पद्धतीने कामावर नेमण्यात आलं होतं. बाहेरील एजन्सीकडून आरोपीला नोकरी देण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाबाबत बाल हक्क आयोगाने शालेय व्यवस्थापनाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवलं आहे. हे प्रकरणा हाताळण्यात शालेय व्यवस्थापनाने हलगर्जीपणा केल्याचं उघड झाल्यामुळे आयोगाने शालेय प्रशासनाला काही प्रश्न विचारले आहेत. सात दिवसांच्या आत शालेय व्यवस्थापनाला आयोगाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचं आहे. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : '...तर योजनेचे 4500 हातातून गमावून बसाल', आताच 'ही' गोष्ट करून घ्या

शालेय व्यवस्थापनावर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न आयोगाने उपशस्थित केला आहे. ही घटना घडल्यानंतर दोन दिवस उलटले तरीही शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. १४ ऑगस्टला शाळेच्या विश्वस्तांनी मुख्याध्यापकांना या प्रकरणाबाबत माहिती दिली. तक्रार केल्यानंतरी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी पीडितीच्या पालकांची भेट घेतली नाही. रुग्णालयात अल्पवयीन मुलींवर १२ तास उपचार सुरु होते. मुलींचं टॉयलेट स्टाफरुमपासून दूरवर आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sharad Pawar: "बदलापूरची घटना राज्य सरकारचं..."; शरद पवार नेमकं काय म्हणाले? 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT