Ladki Bahin Yojana : '...तर योजनेचे 4500 हातातून गमावून बसाल', आताच 'ही' गोष्ट करून घ्या
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
31 जुलैनंतर अर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही
काही महिलांनी अजूनही अर्ज भरला नाही
या महिलांनी नेमकं काय करायचं हे जाणून घेऊयात.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंतर्गत राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात (Bank Account) हे पैसे जमा झाले आहेत. आता ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीयेत. ज्या महिलांनी अजूनही अर्ज भरला नाही आहे. त्यांनी नेमकं काय करायचं हे जाणून घेऊयात.(ladki bahin yojana scheme applicant women do these mistake you will be lose 4500 in hand mukhyamntri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महिलांना 31 जुलैपर्यंत आपला अर्ज दाखल केला होता. त्यामुळेच त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत. 31 जुलैनंतर अर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत.
हे ही वाचा : Nepal Bus Accident: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 14 जण ठार; काठमांडूला जाताना बस कोसळली नदीत
4500 कसे खात्यात येणार?
खरं तर ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत. त्याच महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहेत. आता 4500 रूपये कसे? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे मिळून 4500 महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत जमा होतील त्यांच्याच खात्यात 4500 रूपये जमा होणार आहे.
हे वाचलं का?
विशेष म्हणजे अनेक महिलांनी या योजनेत फॉर्म भरले आहेत. त्यापैकी अनेक जणांना काही कागदपत्रे नीट अपलोड केले नसल्याने, फोटोत स्पष्ट दिसत नसल्या कारणाने किंवा आधार नंबर चुकीचा टाकल्याने त्यांना पुन्हा रीसबमिटचा पर्याय दिला आहे. त्यानुसार महिलांनी पुन्हा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या अर्जावर मंजुरी आल्यानंतर तुम्हाला योजेनेचे पैसे मिळणार आहेत.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : मविआने महाराष्ट्र बंदची हाक का दिली? किती वाजेपर्यंत पाळायचा बंद?
त्यामुळे जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल. तर तुमच्याकडे अजूनही आठवडा आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर संप्टेंबर महिन्यात तुमच्या खात्यात 4500 जमा होणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT