Nepal Bus Accident: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 14 जण ठार; काठमांडूला जाताना बस कोसळली नदीत

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नेपाळमध्ये एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

point

महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

point

जखमी स्थानिक रुग्णालयात दाखल 

Nepal Bus Accident : नेपाळमध्ये एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. येथे 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरातील मार्सयांगडी नदीत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. यामध्ये महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर नोंदणीकृत असलेली ही बस प्रवाशांना घेऊन नेपाळकडे निघाली होती. (Nepal bus accident bus carrying 40 Indian passengers to Nepal plunges into river 14 dead from Maharashtra)

ADVERTISEMENT

नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. तनहुन जिल्ह्यातील डीएसपी दीपकुमार राय यांनी सांगितले की, UP-53- FT 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळली. गुरूवारी (22 ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन ही बस काठमांडुकडे रवाना झाली होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये सर्व भारतीय प्रवासी प्रवास करत होते.

आता उत्तर प्रदेशमधील महाराजगंजचे एसडीएम आणि एडीएम यांना नेपाळला पाठवण्यात आले आहे. नेपाळ सशस्त्र पोलीस दलाचे सहायक प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितले की, घटनास्थळावरून 14 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 16 जखमींना वाचवण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बस चालवणारा चालक गोरखपूरचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात 16 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Uddhav Thackeray : मविआने महाराष्ट्र बंदची हाक का दिली? किती वाजेपर्यंत पाळायचा बंद?

जखमी स्थानिक रुग्णालयात दाखल 

नेपाळच्या स्थानिक माहितीनुसार, या अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एसएसपी माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली नेपाळ लष्कराचे पथक, सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे.

हेही वाचा : Gold Price Today: लयच भारी! आजही घसरल्या सोन्याच्या किंमती; 24 कॅरेटचा भाव काय?

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच, बस नदीत नेमकी कशी कोसळली याचा शोध सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. बचावकार्य आणि मदतकार्याला प्राधान्य दिले आहे.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT