Solapur Accident : तरूणी कॉलेजला निघाली, ती परतलीच नाही; सोलापूरात काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

solapur accident news girl died in accident in front of solapur university
solapur accident news girl died in accident in front of solapur university
social share
google news

Solapur Accident News : सोलापूरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली होती. या धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.शनिवारी सकाळच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला होता. या अपघातात 17 वर्षीय भाग्यश्री निवृत्ती कांबळे हिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कांबळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (solapur accident news girl died in accident in front of solapur university)

ADVERTISEMENT

अकरावीत शिकणारी 17 वर्षीय भाग्यश्री निवृत्ती कांबळे कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघाली होती. यावेळी कॉलेजला जाण्यासाठी भाग्यश्री रिक्षा क्रमांक एमएच 13, सीटी 9479 मध्ये बसली होती. या रिक्षातून प्रवास करत असताना सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने मागून जोरदार धडक दिली.

हे ही वाचा : Chhagan Bhujbal: ‘डबडं.. येडपट, रंग्या.. गप्प मरायचं ना’, भुजबळांना बोलताना जरांगेंनी सोडली पातळी

ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली होती. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून बाहेर पडल्याने भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली.यामुळे तिचा मृत्यू झाला. रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (19) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले (14) हा आठवीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची सायन्सची विद्यार्थिनी आहे.भाग्यश्री चे वडील हे शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असून त्यांना फक्त दोन मुलीच आहेत.त्यापैकी भाग्यश्रीचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिलमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती.

हे ही वाचा : Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आरक्षणाची ‘ती’ याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली, पण…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT