Solapur Crime : बायकोचा गळा चिरला, मुलाचा उशीने घेतला जीव; नंतर वडिलाने…

ADVERTISEMENT

solapur crime story zp school teacher killed her teacher wife and son shocking solapur crime
solapur crime story zp school teacher killed her teacher wife and son shocking solapur crime
social share
google news

Solapur crime News : सोलापूरच्या (Solapur) बार्शीतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने त्याच्या बायको आणि मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिक्षकाने पहिल्यांदा बायकोचा गळा चिरून हत्या केली, त्यानंतर मुलाच्या तोंडावर उशी ठेवून त्याला संपवले, यानंतर स्वत:च आत्महत्या केली आहे. अतुल सुमंत मुंढे (40), तृप्ती अतुल मुंढे (35) ओम सुमंत मुंढे (5) अशी या मृतांची नावे आहेत. या हत्येच्या घटनेने बार्शीत खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. (solapur barshi crime story zp school teacher killed her teacher wife and son shocking solapur crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बार्शी शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना घडली आहे. अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर त्यांची पत्नी तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. या शिक्षक दाम्पत्याला एक मुलगा देखील होता. हे कुटुंब उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते, तर खालच्या मजल्यावर अतुल मुंढे यांचे आई-वडील राहायचे.

हे ही वाचा : MLA Disqualification Case : 2019 चा ठराव, उद्धव ठाकरेंचा अधिकारच धोक्यात! सुनावणीत काय झालं?

दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी वरच्या मजल्यावरून कोणीही खाली न आल्याने अतुल यांच्या आई-वडिलांनी काळजीपोटी वर जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण मुलगा, सुन आणि नातवाचा मृतदेह दिसला होता. मिळालेल्या माहितीनूसार अतुल मुंढे यांनी सुरूवातीला तृप्ती मुंढे (35) यांचा गळा कापून त्यांची हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने मुलाच्या तोंडावर उशी ठेवून त्याला गुदमरून मार टाकले. यानंतर आरोपीनेही स्वत:ने गळफास लावून घेत आत्महत्या केली. अतुल यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी सकाळी वर जावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिक्षकाने पहिल्यांदा बायकोचा गळा चिरून हत्या केली, त्यानंतर मुलाच्या तोंडावर उशी ठेवून त्याला संपवले, यानंतर स्वत:च आत्महत्या केली आहे. अतुल सुमंत मुंढे (40), तृप्ती अतुल मुंढे (35) ओम सुमंत मुंढे (5) अशी या मृतांची नावे आहेत. या हत्येच्या घटनेने बार्शीत खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा : Shiv Sena: ‘तिकडे प्रचाराला जाता.. लाज नाही वाटत?’, उद्धव ठाकरे CM शिंदेंवर का भडकले?

या घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सूरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.तसेच आरोपी शिक्षकाने पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वत: का आत्महत्या केली? या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने सध्या सोलापूर हादरले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.,

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT