Satish Bhosle: वृद्धाला अर्धनग्न करुन बॅटने मारलं, दात पाडले... आमदार सुरेश धसांचा तो 'शागीर्द' कोण?
सतीश भोसले हा आमचा कार्यकर्ता आहे. सोशल मीडियावर आलेले व्हिडिओ मी पाहिले. आता संबंधित पोलीस स्टेशनला मी फोन केलाय. ही घटना दीड ते दोन वर्ष जुनी असून कोणत्यातरी कारखान्यावरती ही घटना घडली आहे." असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुरेश धस यांच्या शागीर्दचा प्रताप

वृद्धाला अर्धनग्न करुन बॅटने मारहाण

वृद्धाला मारहाणीचा आणि दात पाडल्याचा व्हिडीओ व्हायरल
एकीकडे बीडच्याच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली त्याचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडालीये. विशेष म्हणजे या घटनेमुळे संबंध महाराष्ट्र सुन्न पडलेला असताना जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे एका व्यक्तीला गरम लोखंडी रॉडचे अमानुषपणे चटके देण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवरही संताप व्यक्त केला जात आहे. या दोन घटनांवरुन संताप व्यक्त केला जात असताना आता बीडच्या शिरुर तालुक्यातील आणखी एक संतापजनक घटना समोर येत आहे. एका व्यक्तीला दोन ते तीन जण पकडतात आणि एक व्यक्ती बॅटने अतिशय अमानुषपणे मारहाण करतोय असा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
हे ही वाचा >> Abu Azmi निलंबित, पण राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांचं काय? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या प्रकरणात अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे सतीश भोसले. सतीश भोसले हा भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश सरचीटनीस आहे. तर मारहाण झालेल्या व्यक्तीचं नावही समोर आलेलं नाही.
मारहाण करत असलेला व्यक्ती सतीश भोसले असून, तो भाजपचा पदाधिकारी आहे. त्याचबरोबर भाजप आमदार सुरेश धस यांचा तो जवळचा समर्थक म्हणून याची तिकडे ओळख आहे. या प्रकरणामध्ये स्वतः पोलीस फिर्यादी होऊन सुमोटो नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिली आहे.
सुरेश धस काय म्हणाले?
"सतीश भोसले हा आमचा कार्यकर्ता आहे. सोशल मीडियावर आलेले व्हिडिओ मी पाहिले. आता संबंधित पोलीस स्टेशनला मी फोन केलाय. ही घटना दीड ते दोन वर्ष जुनी असून कोणत्यातरी कारखान्यावरती ही घटना घडली आहे. मुलीच्या छेडछाडी मधून ही घटना घडली असून यामध्ये केस झालेली नाही. कायदेशीर कारवाई करावी याबाबत मी पोलिसांसोबत बातचीत केलीये." असं सुरेश धस यांनी म्हटलंय.