रत्नागिरी : माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची पतीनेच केली हत्या; बंगल्यामागेच जाळला मृतदेह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-राकेश गुडेकर, रत्नागिरी

ADVERTISEMENT

बेपत्ता झाल्यानंतर पोलीस शोध घेत असलेल्या रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची हत्या झाल्याचं समोर आलं. पती तथा शिवसेनेचा उपतालुकाप्रमुख सुकांत ऊर्फ भाई सावंत याने हत्या करून मृतदेह जाळून टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

स्वप्नाली सावंत यांची हत्या केल्याची कबुली पती सुकांत सावंत याने दिली असून, पोलिसांनी पती सुकांत सावंतसह त्याला मदत करणारे त्याचा चुलत भाऊ, एक कामगार अशा तिघांना रविवारी अटक केली.

हे वाचलं का?

सुकांत सावंतसह आरोपींविरुद्ध त्यांच्या भादंवि कलम ३०२,२०१, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिघांना १९ सप्टेंबर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

स्वप्नाली सावंत यांच्या हत्येमुळे उडाली खळबळ उडाली

ADVERTISEMENT

स्वप्नाली सावंत यांच्या आई संगिता कृष्णा शिंदे (वय ६४ रा.तरवळ, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुकांत गजानन सावंत (वय ४७ रा. सडामिर्या, रत्नागिरी), चुलत भाऊ रुपेश ऊर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (रा.४३ रा. सडामिर्या, रत्नागिरी), प्रमोद बाबू गावनांक (वय ३३ रा.सडामिर्या, मूळ गुहागर, कामगार) या तिघांविरोधात भादंविक ३०२,२०१, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर स्वप्नाली सावंत दरवर्षीप्रमाणे ३० ऑगस्टला आपल्या मिर्या येथील निवासस्थानी आली होत्या. पती-पत्नी मधील वाद दोन वर्षांपासून कायम होते. त्यातूनच पुन्हा १ सप्टेंबरला स्वप्नाली व सुकांत याच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर सुकांत याने स्वप्नाली यांची गळा दाबून हत्या केली.

बंगल्याच्या मागे जाळला स्वप्नाली सावंत यांचा मृतदेह

1 सप्टेंबरच्या दिवशीच सुकांतने बंगल्याच्या मागील बाजूला स्वप्नालीचा मृतदेह जाळून टाकला. तेथील जागा पुर्णत: स्वच्छ करुन लादीवर टिसीएल पावडर टाकण्यात आली होती. त्यानंतर राखेसह हाडे गायब केली. स्वप्नालीच्या हत्येचा कोणताचा पुरावा सुकांत सावंत यांने घटनास्थळी ठेवला नव्हता.

पत्नीच्या हत्येचा संशय आपल्यावर येवू नये यासाठी त्याने २ सप्टेंबरला पत्नी स्वप्नाली सावंत बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT