Lok Sabha Election : महायुतीत शिवसेना किती लढवणार जागा? शिंदेंनीच सांगितला आकडा
Shiv Sena Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार, हे अखेर स्पष्ट झाले आहे. शिंदे यांनीच हा आकडा सांगितला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महायुती जागावाटपात शिवसेनेला १६ जागा
एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
शिवसेना मुंबईत ३ जागा लढवणार
Eknath Shinde Lok Sabha Election : महाविकास आघाडीने जागावाटप करून उमेदवार जाहीर केले असले, तरी महायुतीच्या जागावाटपाचे भिजत घोंगडे कायम आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता जागा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले असले, तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार हा प्रश्न चर्चिला जात आहे. पण, आता मुख्यमंत्री शिंदेंनीच हा आकडा जाहीर केला आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 21 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला महायुतीत किती जागा मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
अशातच एकनाथ शिंदेंनी शिवसेना किती जागा लढवणार याबद्दल स्पष्ट केले आहे. शिवसेना १६ जागा लढवणार असून, मुंबईत तीन जागा लढवणार असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. यात शिंदेंच्या शिवसेनेला नाशिक, ठाणे, पालघर पैकी कोणत्या जागा मिळणार, हे बघणं औत्सुक्याचे असणार आहे.
हे वाचलं का?
उमेदवारांची शोधाशोध
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतील दोन खासदार आले होते. यात उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांचा समावेश आहे.
हेही वाचा >> 'महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा मिळतील', पवारांनी आकडाच सांगून टाकला!
हे दोन मतदारसंघ शिंदेंच्या सेनेला मिळाले, तर तिसरा मतदारसंघ कोणता असेल, याबद्दलही चर्चा आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. पण, अरविंद सावंत हे ठाकरेंच्याच शिवसेनेत आहेत. तर दुसरीकडे इथे भाजप आपला उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे, अशीही माहिती आहे.
ADVERTISEMENT
कुणाची नावे चर्चेत?
गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्याने आता या जागेवर शिंदेंकडून उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे. या जागेवरून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिला जाणार, असे कळते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभेची जागा मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरले, तर तिथे यशवंत जाधव किंवा काही महिन्यांपूर्वी राज्यसभेवर निवडून गेलेल्या मिलिंद देवरा यांना संधी दिली जाऊ शकते.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 'जर मी इतका वाईट, घाणेरडा, भ्रष्टाचारी होतो तर त्यांनी...', अजितदादांचा थेट सवाल!
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हक्काचे आणि पारंपरिक मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला द्यावे लागले आहेत. आता त्यामुळेच उर्वरित जागांच्या वाटपात भाजप वरचढ ठरणार की, शिवसेना याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT