Buldhana: शिक्षक की राक्षस?; नापास करण्याची धमकी देऊन करायचा अश्लील चाळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जका खान, बुलढाणा

ADVERTISEMENT

Crime news : बुलढाणा : मिलिटरी स्कूलच्या (Military School) शिक्षकाने इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन (Misbehaving) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) येथील आहे. जिथे परीक्षेत नापास करण्याची भीती दाखवून शिक्षकाने आपल्यासोबत अन्याय केल्याचे संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तर आरोपी शिक्षक फरार आहे. (A complaint was lodged in the police station in this regard)

हे धक्कादायक प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड गावातील सैनिकी शाळेशी संबंधित आहे. शाळेत दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींशी त्यांच्या शिक्षकाने गैरवर्तन केल्याची माहिती मिळत आहे. पीडित विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या चुकीच्या गोष्टीची माहिती कुटुंबीयांना दिली होती.

हे वाचलं का?

मुंबईतली डेंजरस क्राईम स्टोरी! पतीला रोज थोडं थोडं मारणाऱ्या पत्नीबद्दल समोर आल्या हादरवणाऱ्या गोष्टी

नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

मुलांसोबत घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला. यानंतर नातेवाइकांनी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधून पोलिस ठाण्यात जाऊन शाळेतील शिक्षकाने लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता. मात्र, पोलिस आरोपी शिक्षकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तो पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

परीक्षेत नापास करण्याची धमकी द्यायचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक विद्यार्थ्यांना परीक्षा आणि प्रॅक्टिकलमध्ये नापास करण्याची धमकी देऊन त्यांच्याशी गैरवर्तन करायचा. हे त्याने अनेकदा केले. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना शिक्षकाबाबत सांगितले.

ADVERTISEMENT

Crime: Instagram वरील मित्राने महिलेला विकलं; जबरदस्तीने लग्न, लैंगिक अत्याचार

पोलिसांची दोन पथके आरोपीच्या शोधात आहेत

पोलिस अधिकारी सचिन कदम सांगतात की, मिलिटरी स्कूलच्या शिक्षकाने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार रविवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी शिक्षकाला अटक करण्यात येईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT