अश्लील व्हिडिओ बनवला अन् दागिनेही लुटले, शिक्षिकेच्या आत्महत्येने खळबळ

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

teacher rape blackmail cash gold jewellary suicide bhind madhya pradesh
teacher rape blackmail cash gold jewellary suicide bhind madhya pradesh
social share
google news

देशात अनैतिक संबंधाच्या (Extra Marital Affair) घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या (Madhy Pradesh) भिंडमधून एक हादरवून टाकणारी घटना घडलीय. एका लग्न झालेल्या शिक्षिकेला (Teacher Suicide) लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. तसेच आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल (Blackmail) करत दागिने देखील लुटले होते. विशेष म्हणजे तिच्याच प्रियकराने हा प्रकार केल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. दरम्यान एका शिक्षिकेने आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलंय. (teacher rape blackmail cash gold jewellary suicide bhind madhya pradesh)

ADVERTISEMENT

आरोपीने शिक्षिकेला (Teacher Suicide) आपल्य़ा प्रेमाच्या जाळ्यात फासून वारंवार तिच्यावर बलात्कार केला होता.या दरम्यान आरोपीने तिचा अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील बनवला होता. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याकडून 5 तोळ्याचे दागिने देखील लुटले होते. आरोपी इतकं करून सुद्धा सतत ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. शिक्षिकेने आत्महत्या करून सुसाईड नोट देखील लिहली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने 5 आरोपींची नावे लिहली होती.

हे ही वाचा : मोलकरीण.. हनीट्रॅप अन् डॉक्टर.. भयंकर घटनेचा कसा झाला पर्दाफाश?

शिक्षिकेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार,माझ्या बायकोला (Teacher Suicide)दिपेश नावाच्या एका व्यक्तीने प्रेमाच्या जाळ्यात फासले होते. हे प्रेम यशस्वी होण्यासाठी दिपेशला त्याच्या मित्रांनी मदत केली होती. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. आरोपी दिपेश मित्रांसह मिळून माझ्या पत्नीला सतत त्रास द्यायचा. दररोज तिला धमक्या देऊन ब्लॅकमेल देखील करायचा. या धमक्यांमुळे पत्नीने आत्महत्या केल्याचा आरोप त्याने केला आहे.

हे वाचलं का?

कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला प्राईवेट शाळेत शिक्षिका होती. शिक्षिकेने लिहलेली सुसाईट नोट खरंच तिने लिहली आहे का? याचा तपास केला जात आहे. यासाठी तिची हॅंड राईटींग मागणवण्यात आले आहे. तसेच सुसाईड नोटमध्ये उल्लेख असले्ल्या 5 व्यक्तींवर 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

हे ही वाचा : आधी प्रेम नंतर दिलं विष…, ‘कुंडली’च्या नादात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडलाच संपवलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT