Thane Crime News : बेपत्ता चिमुकलीचा 3 दिवसानंतर थेट मृतदेहच सापडला, ठाण्यात खळबळ

मुंबई तक

तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हिल लाईन पोलीस स्टेशन परिसरात सापडला मृतदेह

point

धक्कादायक घटनेनं ठाण्यात खळबळ

Thane Crime News : तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ठाण्यातील उल्हासनगरमध्ये १८ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेल्या तीन वर्षीय मुलीचा गुरुवारी थेट सापडला. त्यानंतर आता स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्रेम नगर भागातील तिच्या घराजवळून ही मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. झोन-4 चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे म्हणाले, 'बेपत्ता मुलीच्या आईने गुरुवारी हिल लाइन पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर तिचा मृतदेह सापडल्याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईचे आश्वासन नागरिकांना दिलं आहे.
 

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईमध्ये हालचाली, हॉटेल्स बूक?


पोलिसांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले असून, त्यावरुन या प्रकरणाचा  काही सुगावा लागतो का यावर लक्ष आहे. प्राथमिक तपासात मुलीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरी हा खून असल्याची शक्यताही पोलिसांनी नाकारलेली नाही. 

दरम्यान, या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केले असून या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची मागणी केली आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवून मुलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मुलीच्या मृत्यूचं खरं कारण लवकरच समोर येईल आणि आरोपींना शिक्षा होईल असं पोलीस म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp