Kalwa Crime: बायकोची गोळी झाडून हत्या, पुढच्याच क्षणी हार्ट अटॅकने नवऱ्याचा मृत्यू

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

thane crime wife shot dead and husband died from heart attack kalwa crime story
thane crime wife shot dead and husband died from heart attack kalwa crime story
social share
google news

ठाण्याच्या (Thane) कळवा (Kalwa) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नवऱ्यानेच बायकोवर गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना घडली.या घटनेनंतर आरोपी नवऱ्याचा हार्ट अटॅकने (Hear Attack) मृत्यू झाला आहे. दरम्यान एकाच घरात दोन मृतदेह आढळ्याने कळवा हादरलं आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. तसेच हे प्रकरण आत्महत्येचे की हत्येचे आहे? याचा पोलीस तपास करत आहे. (thane crime wife shot dead and husband died from heart attack kalwa crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कळव्याच्या (Kalwa) कुंभार आळी परिसरात ही घटना घडली आहे. कुंभार आळी परीसरातील यशवंत निवासमधून 1 सप्टेंबर 2023 च्या रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक गोळीबाराचा आवाज आला होता. या आवाजानंतर नातेवाईक आणि स्थानिकांनी साळवी यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी घरात प्रमिला साळवी या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर दिलीप साळवी निपचित पडले होते. नवरा-बायकोच्या या मृत्यूनंतर स्थानिकांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांनी दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला होता.

हे ही वाचा : Maratha Akrosh Morcha : ‘…मग आताच का कायदा सुव्यवस्था निर्माण झाली?’ ; राऊतांचा जळजळीत सवाल

सुत्रांनुसार, दिलीप साळवी यांनी आधी बायको प्रमिला साळवीवर दोन राऊंड फायर केले. यामध्ये गोळी लागून प्रमिला साळवी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दिलीप साळवी यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीच्या आवाजामुळे ही घटना उघडकीस आली होती.

हे वाचलं का?

या प्रकरणावर डीसीपी गणेश गावडे म्हणाले की, साळवी दाम्पत्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूमागचं खरं कारण समोर येणार आहे. तसेच दोघा नवरा-बायकोच्या हत्येमागचं कारण शोधलं जातं आहे. कुणी कुणावर गोळी झाडली? ही हत्या आहे की आत्महत्या आहे? असे अनेक प्रश्न या घटनेवरून उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस शोधत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा : Crime news : 30 वर्षीय तरुणीची हत्या करून मृतदेह फेकला अंबोली घाटात, कारण…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT