पैशाच्या वादातून मित्रालाच भररस्त्यात भोसकलं, सगळे पाहत राहिले, ठाण्यातील थरारक घटना CCTV घटना मध्ये कैद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफ आणि आरोपी हे शाळेतील मित्र होते. 20 मे रोजी दिवसभरात त्यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भररस्त्यात भाजी विक्रेत्याला भोसकलं

10-15 वार झाले, पण कुणीच मदतीला नाही धावलं
Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील अमृत नगर परिसरात 20 मे 2025 च्या रात्री एक धक्कादायक घटना घडली. 20 वर्षीय सैयद अशरफ या भाजी विक्रेत्यावर त्याच्याच चार मित्रांनी पैशाच्या वादातून चाकूहल्ला करून त्याची हत्या केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, अशरफवर 10 ते 15 वेळा चाकूने वार करण्यात आले, मात्र उपस्थित कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
हे ही वाचा >>लेकानं आईशी ठेवले अनैतिक संबंध, लेकीनं पाहताच बापानं...
गंभीर जखमी झालेल्या अशरफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे, यापैकी एक अल्पवयीन आहे, तर इतर दोन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफ आणि आरोपी हे शाळेतील मित्र होते. 20 मे रोजी दिवसभरात त्यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता. रात्री अशरफ दुकान बंद करून घरी परतत असताना, अमृत नगर परिसरात आरोपींनी त्याला पुन्हा गाठले. यावेळी वाद वाढला आणि त्यांनी अशरफवर चाकूने हल्ला केला. सहायक पोलिस निरीक्षक संजय दावने यांनी सांगितले की, अशरफने जबरदस्तीने पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या मित्रांनी त्याची हत्या केली.
हे ही वाचा >>नाश्ता, मटण, चिकन! वाल्मिक कराडला जेलमध्ये तब्बल 10 हजाराची... तुरुंगातून आलेले रंजीत कासले काय म्हणाले?
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. ही घटना परिसरात खळबळ माजवणारी ठरली आहे.