Ulhasnagar: शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाच्या निर्घृण हत्येचं कारण समोर…
Ulhasnagar Crime: उल्हासनगरमध्ये शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. आता याच हत्येचं नेमकं कारण समोर आलं असून मुख्य आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

Ulhasnagar Crime: उल्हासनगर: शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट शाखाप्रमुखाच्या हत्येने संपूर्ण उल्हासनगर (Ulhasnagar) शहर हादरून गेलं होतं. मात्र, आता या हत्येमागचं नेमकं कारण समोर आलं आहे. शिवसेनेचा शाखाप्रमुख असलेला शब्बीर शेख हा खरं तर स्वत: जुगाराच्या अड्डा चालवत होता. इथेच काही वाद झाल्याने पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आली. केवळ पाच हजार रुपये उसने देण्यास नकार दिल्याने 7 ते 8 लोकांच्या टोळीने धारधार चाकू आणि सुऱ्याने 20 ते 25 सपासप वार करून त्याच्या जुगाराच्या अड्ड्यावरच त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. (the real reason behind the gruesome murder of shiv sena shinde group shakhapramukh has come to light)
ही भयंकर घटना 26 मे 2023 रोजी घडली होती. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक पाच या भागात असलेल्या जय जनता कॉलनीमध्ये घडली होती. शब्बीर सलीम शेख (वय 45) असे हत्या झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुखाचे नाव असून तो याच परिसरात मटका, जुगाराचा अड्डा चालवत होता.
हे ही वाचा >> Delhi Crime: सपासप.. चाकूचे 40 वार नंतर दगडाने केला गर्लफ्रेंडचा चेंदामेंदा
याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात एका टोळीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू असता या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह चार मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. चार आरोपीमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. विक्रम उर्फ विकी राजेंद्र कवठणकर ( वय 26 वर्ष) दिनेश राजेंद्र कवठणकर (वय 23 वर्ष, दोघेही रा. उल्हासनगर), प्रशांत उर्फ सलाड सुरेश तायडे ( वय, 24 रा. टिटवाळा) तकबीर दादाजी बोराळे, (वय 23, रा. उल्हासनगर), असे २४ तासात अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.
काय आहे नेमकी घटना?
मृतक शब्बीर हा उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात जय जनता कॉलनीमध्ये कुटुंबासह राहत होता. काही दिवसापासून मुख्य हल्लेखोर विक्रम उर्फ विकी या गुंडांशी पूर्ववैमनस्यातून मृत शब्बीरच्या भावाशी भांडण झाले होते. त्यावेळी दोन्ही गटावर हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच भांडणाचा राग तसेच मुख्य आरोपीने 5 हजार रुपये उसने मागितले होते. मात्र मृतक शब्बीरने देण्यास नकार दिला होता. याच दोन्ही वादातून 26 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जय जनता कॉलनीमध्ये असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शब्बीर असतानाच, मुख्य आरोपी विक्रमसह त्याच्या टोळीने धारधार चाकू व सुरे खुलेआम हातात घेऊन त्याच्याच जुगार अड्ड्यावर हल्ला केला होता. हल्यावेळी जुगार खेळणाऱ्या जमावामध्ये एकच पळापळ झाली होती. दुसरीकडे हल्लेखोर शब्बीरवर हल्ला करताना सीसीटीव्ही कैद झाले होते.