पिंपरी: भयंकर! झोपेतून उठवलं म्हणून मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Child kills birth mother in Pimpri-Chinchwad
Child kills birth mother in Pimpri-Chinchwad
social share
google news

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवड: झोपेतून उठवल्यामुळे जन्मदात्या आईची (Mother) मुलाने (Son) हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात घडली आहे. परेगाबाई अशोक शिंदे (वय 58 वर्ष) अशी हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विश्वास अशोक शिंदे (वय 30 वर्ष) अस आरोपी तरुणाचे नाव आहे. विश्वास हा सराईत गुन्हेगार असून हत्येप्रकरणी तो चार वर्षे येरवडा कारागृहात होता. केवळ आईने झोपेतून उठवलं या रागातून आपल्या पोटच्याच आईची हत्या केल्याच्या घटनेने पिंपरीत चिंचवडमध्ये एकच खळबळ माजली आहे. (the son killed his birth mother because he was angry at being woken up from his sleep)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, परेगाबाई या स्वतःच पोट भरण्यासाठी कचरा गोळा करण्याचे काम करायचा. त्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अशात मुलगा विश्वास हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्या आपल्या मुलाला कायम दोष द्यायच्या. अशातच 9 मार्च रोजी अचानक आरोपी विश्वासने आपल्या आईची हत्या केली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मार्च रोजी नेहमीप्रमाणे परेगाबाई मुलगा विश्वासला झोपेतून उठवायला गेल्या. यावेली त्यांनी मुलगा विश्वासला कामावर का गेला नाहीस? अशी विचारणा केली. पण याच गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला. हाच राग त्याने मनात धरला आणि थेट रस्त्यावर पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने आई परेगाबाईच्या डोक्यावर वार केला.

हे वाचलं का?

मुलाने अचानक केलेल्या या हल्ल्यापासून बचाव व्हावा आणि जीव वाचवण्यासाठी गल्लीतून त्या धावत सुटल्या. यावेळी काही व्यक्तींना त्यांना मदत करत धीर दिला. तसेच त्यांच्या विवाहित मुलीला फोन करून त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.

ADVERTISEMENT

मुलगा अडचणीत येऊ नये यासाठी परेगाबाई या पडून त्यांना अपघात झाल्याचं रुग्णालय प्रशासनाला सांगण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच परेगाबाई या कोमात गेल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यू असल्याने रुग्णालय प्रशासनाने याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस कर्मचारी यांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ सखोल चौकशी केली. त्यामुध्ये हा अपघात नसून त्यांचा खून झाल्याचं पुढे आले.

ADVERTISEMENT

Nashik Crime : दारुड्या मुलाकडून आईची सिमेंटच्या खांबावर डोकं आपटून हत्या

दुसरीकडे आईचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी विश्वास पळून जाण्याचा तयारीत होता. पण त्याअगोदरच गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळण्याचं काम केलं. दरम्यान, एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी आरोपी विश्वास हा 2015 पासून चार वर्षे येरवडा कारागृहात होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT